शेतकरी बंधूंसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील काही भागांमध्ये नऊ ते अकरा जानेवारी दरम्यान पाऊस होण्याची शक्यता आहे. पश्चिमी चक्रावात आणि अरबी समुद्रावरून होणारा बाष्पचा पुरवठा त्यामुळे हिमालय पर्वत व लगतच्या राज्यांमध्ये बर्फवृष्टी होत आहे.
मध्य भारतामध्ये देखील काही राज्यांमध्ये विजा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे. याच वातावरणीय बदलाचा परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे. आज दिनांक आठ रोजी मराठवाड्यातील औरंगाबाद, हिंगोली, नांदेड, परभणी आणि जालना या जिल्ह्यामध्ये ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.तसेच या क्षेत्रात हवामान खात्याकडून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यासोबत तर उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकणातही तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
उद्या या ठिकाणी होऊ शकते गारपीट
दिनांक 9 रोजी विदर्भात गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्याला गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आले आहेत.तसेच मागील दोन दिवसांपासून राज्यात थंडीचे प्रमाण कमी झाले असून राज्यातील बहुतांश ठिकाणी किमान तापमान 18 ते 21 अंशाच्या दरम्यान आहे तर कमाल तापमान 27 ते 30 अंश आहे.
राज्यातील या भागांना आहे यलो अलर्ट
1-दिनांक 9- यवतमाळ,गडचिरोली, वर्धा, नागपूर, अमरावती, अकोला आणि परभणी
2- दिनांक 10 – अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर,अमरावती, वाशिम आणि बुलढाणा
3- दिनांक 11- नागपूर, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि वर्धा
Share your comments