1. बातम्या

हवामान अंदाज : केरळ च्या काही भागात अलर्ट, महाराष्ट्रात पण 'ह्या' ठिकाणी होणार "झमाझम" पाऊस

भारतीय हवामान खाते (Indian Meteorological Department) पावसाच्या संदर्भात आगाऊ माहिती ही लोकांसाठी देत असते आणि ह्या माहितीच्या आधारे शेती विषयक कामे किंवा अन्य काही महत्वाची कामे करण्याचा अंदाज बांधता येतो. असाच अंदाज भारतीय हवामान खात्याने आज बांधलाय, भारतीय हवामान खात्यानुसार केरळ मध्ये आजपासून पुढील तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे आणि म्हणुन केरळ राज्यासाठी (For Keral State) हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
heavy rain

heavy rain

भारतीय हवामान खाते (Indian Meteorological Department) पावसाच्या संदर्भात आगाऊ माहिती ही लोकांसाठी देत असते आणि ह्या माहितीच्या आधारे शेती विषयक कामे किंवा अन्य काही महत्वाची कामे करण्याचा अंदाज बांधता येतो. असाच अंदाज भारतीय हवामान खात्याने आज बांधलाय, भारतीय हवामान खात्यानुसार केरळ मध्ये आजपासून पुढील तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे आणि म्हणुन केरळ राज्यासाठी (For Keral State) हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे.

भारतीय हवामान खात्याने (IMD) आपल्या सूचनेत म्हटले की 11,12 आणि 13 ऑक्टोबर रोजी केरळ मध्ये काही भागात पावसाची शक्यता आहे आणि त्यासाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट देखील जारी केला आहे.

 कर्नाटकात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे कर्नाटकच्या (Karnatka) सागरी किनाऱ्यावर 11 तारखेपासून ते 13 तारखेपर्यंत पावसाची शक्यता आहे तसेच कर्नाटकच्या मध्य उत्तरेत काही भागात 10 12 आणि 13 ऑक्टोबरला मुसळधार पावसाचा अलर्ट हवामान खात्याने दिला आहे. ह्या व्यतिरिक्त रायसिमा मध्ये काही भागात येत्या चार दिवसासाठी पावसाची शक्यता सांगण्यात आली आहे. हवामान खात्यानुसार आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) राज्यात देखील झमाझम पावसामुळे वातावरण चांगले शितल बनणार आहे.

महाराष्ट्रात पण बरसणार पावसाच्या सरी

महाराष्ट्रात (Maharashtra) देखील हवामान खात्याने पावसाचा अंदाज बांधला आहे, भारतीय हवामान खात्यानुसार आपल्या महाराष्ट्रातील काही भागात पावसाच्या रिमझिम सरी बरसणार आहेत. कोंकणमध्ये 11 ऑक्टोबर रोजी पावसाची संतधार बरसणार आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात 10 आणि 11 ऑक्टोबर रोजी पावसाची हजेरी लागणार असा अंदाज हवामान खात्याने बांधला आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त गोव्यात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 पुढील 24 तास आणि पाऊस

 

पुढील 24 ते 48 तासांदरम्यान, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, मध्य प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेटे, तामिळनाडू, केरळ, कर्नाटकची किनारपट्टी आणि कोकण किनारपट्टी आणि मुंबई, गोवा, आंध्र प्रदेश, रायलसीमा,  तेलंगणाच्या काही भागात मध्यम ते हलका पाऊस होऊ शकतो.  या दरम्यान, पश्चिम बंगाल, सिक्कीम, ईशान्य भारत, बिहारचा काही भाग, छत्तीसगड, दक्षिण मध्य प्रदेश आणि दक्षिण गुजरातमध्ये हलक्या पावसाच्या सऱ्या बरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

English Summary: meterological department alert kerala and maharashtra will rain next few days Published on: 10 October 2021, 07:28 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters