राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते आज देखील राज्यात पाऊस पडणार आहे. यामुळे पुन्हा एकदा टेन्शन वाढले आहे. राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. निश्चितच यामुळे संबंधित विभागातील शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे.
अवकाळी पावसाने आणि गारपिटीने वाया जाणार आहेत. अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले पीक ऐन काढणीच्या अवस्थेत पावसामुळे खराब झालेत यामुळे बळीराजाच्या हाता-तोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा हिरावला गेला असल्याचे चित्र उमटत आहे.
आग्नेय अरबी समुद्रात असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती नैर्ऋत्य राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीवर सक्रिय होती. तर पूर्व विदर्भापासून, मराठवाडा, कर्नाटक किनारपट्टीपर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. खंडित वारे वाहत आहेत.
या पूरक स्थितीमुळे आज (ता. १३) राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच कमाल तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
या पिकाचे तेल 20 हजार रुपये प्रति लिटर, दर चार महिन्यांत 1 लाखाची कमाई..
वादळी वाऱ्यासह पाऊस (Rain) सुरू असतानाच राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमान चाळिशीपार गेले आहे. आज (ता. १३) मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकणात वादळी पावसासह गारपीट, तर उर्वरित राज्यातही वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
इंदापूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल, खडकवासलाचे पाणी येत नसल्याने शेती अडचणीत
काड्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. बुधवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४१.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जळगाव, ब्रह्मपुरी येथे तापमान ४१ अंशांपेक्षा अधिक होते. तर वर्धा, सोलापूर, परभणी, धुळे येथे पारा ४० अंशांपार पोचला होता. उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान वाढून ३५ ते ३९ अंशांच्या दरम्यान होते.
भीमा पाटस कारखान्याप्रकरणी संजय राऊत यांची 26 एप्रिलला दौंडला होणार सभा, होणार मोठा गौप्यस्फोट
माजी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! आता शेतकरी मुलाशी लग्न केल्यास 2 लाख रुपये मिळणार...
कांद्याच्या अनुदानासाठी बनावट पावत्या, कारवाईची शेतकऱ्यांची मागणी...
Share your comments