मुंबई
ग्रामविकास मंत्रालयातंर्गत राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमध्ये १९ हजार ४६० पदांची भरती केली जाणार आहे. गट 'क' संवर्गातील आरोग्य विभागाची १०० टक्के आणि इतर विभागाची ८० टक्के भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रिया आज (दि.५) पासून सुरुवात झाली आहे. या भरतीबाबतची जाहिरात ५ ऑगस्ट रोजी प्रकाशित करण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली होती.
अर्ज कसा करायचा?
५ ऑगस्ट २०२३ ते २५ ऑगस्ट २०२३ पर्यंत अर्ज करता येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारानी ज्या जिल्हा परिषदेमध्ये अर्ज करावयाचा आहे त्या जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर जाऊन २५ ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
पुणे जिल्हा परिषदेत १ हजार जागांची भरती
पुणे जिल्हा परिषदेची भरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे. पुणे जिल्हा परिषद मधील भरती प्रक्रिया मागील चार वर्षापासून रखडली आहे. २०१९ मध्ये जि.प.साठी भरती प्रक्रिया सुरू केली होती. मात्र तिला स्थगित आली. त्यानंतर आता ही प्रक्रिया सुरु होत आहे. सुमारे १ हजार जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.
Share your comments