1. बातम्या

अन्न सुरक्षा, सुरक्षितता आणि पोषणावर होणाऱ्या परिणामांसाठी जी-20 देशांची बैठक

नवी दिल्‍ली: कोविड-19 चा अन्न सुरक्षा, सुरक्षितता आणि पोषणावर होणाऱ्या परिणामांचा विचार करण्यासाठी आयोजित केलेल्या जी-20 कृषीमंत्र्यांच्या असाधारण व्हर्चुअल बैठकीत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर मंगळवारी सहभागी झाले. लॉकडाऊनच्या काळात सोशल डिस्टन्सिंग, आरोग्य आणि स्वच्छतेच्या निकषांचे पालन करून शेतीविषयक कामांना भारत सरकारने निर्बंधांमधून वगळल्याची माहिती तोमर यांनी या परिषदेत दिली.

KJ Staff
KJ Staff


नवी दिल्‍ली:
 कोविड-19 चा अन्न सुरक्षा, सुरक्षितता आणि पोषणावर होणाऱ्या परिणामांचा विचार करण्यासाठी आयोजित केलेल्या जी-20 कृषीमंत्र्यांच्या असाधारण व्हर्चुअल बैठकीत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर मंगळवारी सहभागी झाले. लॉकडाऊनच्या काळात सोशल डिस्टन्सिंग, आरोग्य आणि स्वच्छतेच्या निकषांचे पालन करून शेतीविषयक कामांना भारत सरकारने निर्बंधांमधून वगळल्याची माहिती तोमर यांनी या परिषदेत दिली.

या आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह सुरक्षित राखण्यासह अन्न साखळीचे सातत्य टिकवण्या संदर्भातील उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी सौदी अरेबियाच्या अध्यक्षांच्या पुढाकाराने  या बैठकीचे आयोजन करण्यात आले. सर्व जी-20 सदस्य देशांचे कृषीमंत्री आणि इतर काही अतिथी देश आणि आंतरराष्ट्रीय संघटना यामध्ये सहभागी झाल्या होत्या. जी-20 देशांना एकत्र आणण्यासाठी सौदी अरेबियाने घेतलेल्या पुढाकाराचे तोमर यांनी स्वागत केले.त्यानंतर जी-20 देशांच्या कृषीमंत्र्याचा एक जाहीरनामा बैठकीत स्वीकृत करण्यात आला. कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर अन्नाची नासाडी आणि नुकसान टाळण्याचा, सीमेपलीकडे अन्न साखळीमधील पुरवठ्यात सातत्य टिकवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

अन्न सुरक्षा आणि पोषणासाठी एकत्रितपणे काम करण्याचा, परस्परांमध्ये योग्य प्रकारच्या आचारविचारांची देवाणघेवाण करण्याचा, संशोधनाला प्रोत्साहन देण्याचा, जबाबदार गुंतवणूक, नवनिर्मिती आणि सुधारणांवर भर देण्याचा आणि शेती आणि अन्न प्रणालीची शाश्वती आणि प्रतिरोध यात सुधारणा करण्याचा संकल्पही या कृषीमंत्र्यांनी केला. प्राण्यांकडून मानवामध्ये संक्रमित होणाऱ्या रोगांच्या प्रतिबंधासाठी कठोर सुरक्षा आणि स्वच्छतेसंदर्भात विज्ञानाधारित आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वांची निर्मिती करण्याबाबतही जी-20 देशांनी सहमती व्यक्त केली.

English Summary: Meeting of the G-20 countries on the implications for food security, safety and nutrition Published on: 24 April 2020, 05:35 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters