महाराष्ट्रात गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा नेहमीच वादळी ठरते. यामुळे याची चर्चा नेहेमी सुरु असते. असे असताना आता यामध्ये शौमिका महाडिक यांनी सभा गाजवली आहे. याचे कारण म्हणजे त्या थेट सतेज पाटील, हसन मुश्रीफांना भिडल्या आहेत. सभेसाठी विरोधक सभासदांना बसण्यास जागा न दिल्याने महाडिक गटाच्या संचालिका शौमिका महाडिक या आक्रमक झाल्या.
या गदारोळातच गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी सर्वसाधारण सभेची प्रस्तावना सादर केली. यामुळे गोंधळ झाला. यावेळी शौमिका महाडिक यांनी न वाचता बोला, सभासदांच्या डोळ्यात डोळे घालून बोला, अशी घोषणाबाजी केली. यामुळे वातावरण चांगलेच तापले. माजी मंत्री सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांच्यासारखे दिग्गज नेते असताना, शौमिका महाडिक प्रश्न उपस्थित करत होत्या.
वड्यातील महासैनिक दरबार हाॅलमध्ये ही सभा होती, यावेळी ज्या सभासदांनी आम्हाला निवडून दिलं, त्यांच्यासाठी जागा नसेल तर मी मंचावर येणार नाही, असं शौमिका महाडिक म्हणाल्या. लहान दूध संघ शेतकऱ्यांना दर देत असताना, गोकुळसारख्या मोठ्या दूध संघाला का परवडत नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
सभा शांततेत पार पडावी, सर्व सभासदांच्या प्रश्नांची उत्तरे समर्पक मिळावीत, अशी आमची भूमिका आहे.माझ्या लेखी प्रश्नांना सुद्धा उत्तरे मिळालेली नाहीत. त्यामुळे मला मुद्दे बाहेर मांडावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, शौमिका महाडिक या भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी आहेत. माजी आमदार महादेवराव महाडिक हे त्यांचे सासरे तर भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक हे त्यांचे दीर आहेत.
महत्वाच्या बातम्या;
टोमॅटो 500 रुपये, कांदे 400 रुपये किलो, महागाईमुळे नागरिकांचे मोठे हाल..
आताची मोठी बातमी! पुण्यात दारू बंदी, जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश..
दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याचा देशपातळीवर सन्मान, शरद पवारांकडून कौतुक
Share your comments