आपल्या देशात कधी कोणता निर्णय लावला जाईल कोणीही सांगू शकत नाही. देशात मद्यपान आणि मांसाहार करणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. असे असताना आता एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतील एका राज्यातील दोन शहरांमध्ये मांस आणि मद्य विकण्यास बंदी आणली आहे. या शहरांना पवित्र शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे. यामुळे आता येथे लोकांना मांसाहार करता येणार नाही, यामुळे त्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री सिंह चौहान यांनी आपल्या राज्यातील दोन शहरांमध्ये मांस आणि मद्यपानावर बंदी आणली आहे. कुंडलपूर आणि बांदकपूर या दोन्ही शहरांबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे.
शिवराज सिंह चौहान यांनी राजधानी भोपाळ इथे 285 किमी दूर दमोह जिल्ह्यातील कुंडलपूर इथे जैन समुदायाच्या पंचकल्याणक महोत्सवात ही घोषणा केली आहे. बांदकपूर शहर भगवान शंकराच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. या शहरातील शंकराला मुख्य दैवत मानण्यात येते. यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. महाशिवरात्रीनिम्मित बांदकपूरमध्ये मोठी पुजाअर्चा करण्यात आली. यावेळी त्यांनी मेडिकल आणि इंजिनियरिंग अभ्यासक्रम हिंदीमध्ये सुरू करण्याबाबतही माहिती दिली आहे.
आता दोन शहरात मांस आणि मद्य विकण्यात येणार नाही. जर कोणी याबाबत विक्री केली तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. ही शहरे शेवटपर्यंत अशीच पवित्र राहतील असा निर्धार चौहान यांनी केला आहे. यावर नागरिकांनी सुध्दा एकमत नोंदवले आहे. यामुळे आता ज्याला या गोष्टी पाहिजे असतील त्याला बाहेरच्या शहरात या गोष्टी मिळतील. यामुळे अनेकांची पंचाईत देखील होणार आहे. यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
यामुळे मांस खाणाऱ्या लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. पहिल्यांदाच असा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी असा कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यामुळे सर्वकाही सुरळीत चालले होते. आता मद्यपान आणि मांस खाण्यासाठी नागरिकांना शहराबाहेर जावे लागणार आहे. यामुळे या निर्णयाची चांगलीच चर्चा रंगली आहे.
Share your comments