या योजनेत १८ ते ६५ या वयोगटातील व्यक्तींसाठी किमान पाच लाखांचा आणि कमाल २५ लाखांचा विमा मिळेल. विमा मॅक्स लाइफ इन्शुरन्स कंपनीने आज ‘मॅक्स लाइफ सरल जीवन बिमा’ सादर करत असल्याची घोषणा केली. समजण्यास अतिशय सोप्या आणि साध्या अशा वैशिष्ट्यांसह ग्राहकांना आर्थिक सुरक्षा देण्याच्या उद्देशाने ही योजना तयार करण्यात आली आहे. ही नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, वैयक्तिक प्युअर-रिस्क प्रीमिअम जीवन विमा योजना आहे.
मॅक्स लाइफच्या सरल जीवन बिमा योजनेत १८ ते ६५ या वयोगटातील व्यक्तींसाठी किमान पाच लाखांचा आणि कमाल २५ लाखांचा विमा ५ ते ४० वर्षांच्या कालावधीसाठी काढता येतो. ‘मॅक्स लाइफ सरल जीवन बिमा’मध्ये ग्राहकांना रेग्युलर पे, सिंगल पे आणि लिमिटेड पे (५ आणि १० वर्षांचा पर्याय) अशा प्रीमिअमच्या कालावधीचे पर्याय आहेत. तसेच, वार्षिक, सहामाही किंवा मासिक असे प्रीमिअम पेमेंटच्या कालावधीचेही पर्याय उपलब्ध आहेत.
मॅक्स लाइफ सरल जीवन बिमा योजनेसह कंपनीची ग्राहकांसोबत असलेली बांधिलकही येतेच. याच बांधिलकीमुळे आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये कंपनीने क्लेम्स पेड रेशिओत ९९.२२ टक्के अशी कामगिरी केली. विश्वासाचे कायमस्वरुपी वचन जपत मॅक्स लाइफने आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये १५,३४२ दाव्यांची प्रतिपूर्ती केली. सत्याच्या अंतिम क्षणी आपली बांधिलकी जपत ग्राहकासोबत कंपनी उभी राहते, हेच यातून दिसते आणि जीवन विमा देणाऱ्या कंपनीचे ग्राहकांशी असलेले नातेच यातून अधोरेखित होते.
मॅक्स लाइफने कंतारसोबत नुकत्याच केलेल्या ‘इंडिया प्रोटेक्शन कोशंट ३.०’ मधून स्पष्ट झाले की, भारतात टर्म प्लॅन घेतलेला नाही अशा लोकांपैकी ३३ टक्के लोकांना टर्म प्लॅन कसे उपलब्ध असतात याची माहितीच नाही आणि त्यांना वाटते की, यासाठी ‘त्यांना फार अधिक प्रीमिअम भरावा लागेल’. याच कारणामुळे त्यांनी टर्म प्लॅन घेतलेला नाही. नव्या ‘मॅक्स लाइफ सरल जीवन बिमा’ या योजनेत ग्राहकांना सहजसोप्या पद्धतीने आर्थिक सुरक्षा पुरवली जाईल.
सध्याच्या काळात निवडीसाठी अनेक प्रकारे टर्म इन्शुरन्स प्लॅन्स आणि पॉलिसीज उपलब्ध आहेत. मात्र, सर्वसामान्य ग्राहकाला माहितीच्या आधारे निवड करता येईल अशी सहजसोपी उत्पादने पुरवणेही महत्त्वाचे आहे. स्टँडर्ड इंडिव्हिज्युअल टर्म लाईफ इन्शुरन्स प्रोडक्टसंदर्भातील आयआरडीएआयच्या नियमांनुसार आणि देशात जीवन विम्याचे प्रमाण वाढवण्याची बांधिलकी जपत ‘मॅक्स लाईफ सरल जीवन बिमा’ या योजनेतून ग्राहकांच्या महत्त्वाच्या आर्थिक सुरक्षितता गरजा सोप्या आणि साधारण पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
आम्हाला आशा आहे की हे साधारण उत्पादन भारतीयांना, विशेषत: पहिल्यांदाच विमा घेणाऱ्या ग्राहकांना टर्म इन्शुरन्स पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन देऊन आपल्या प्रियजनांना सुरक्षित करण्यात साह्य करतील, असे मत मॅक्स लाइफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत त्रिपाठी यांनी व्यक्त केले.
Share your comments