पुणे शेखर पायगुडे : महाराष्ट्रातील सर्वात जास्त पावसाचा प्रदेश म्हणून लेख असलेल्या पुणे जिल्यातील, मुळशी, वेळ , हवेली आणि भोर या मावळ तालुक्यात यंदा मात्र पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे भाताचे पीक धोक्यात आले असून शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.
पुणे जिल्हयातील गामीण भागात मोठया प्रमाणावर केली जाते. बहुतांश शेतकऱ्यांचे जीवन भातशेतीवर अवलंबून आहे. परंतु यावर्षी पावसाने दडी मारली आहे. संपूर्ण जुलै महिना पावसाविना गेला आहे. मुळशी तालुक्यातील दारवली प्रगतिशील शेतकरी शुभम प्रभाकर बलकवडे कृषी जागरणशी बोलताना म्हणाले कि, “आमच्या भागात अंदाजे १५ जुलै पर्यंत आमच्या भागातील भात लावण्या पूर्ण होतात. यावर्षी फक्त २०% लावण्या झाल्या आहेत. अजूनही शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. यामुळे तांदळाचा भाव वाढण्याची शक्यता आहे. आता सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. तहसीलदारांनी लवकरात लवकर पंचनामे करून ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना मदत करावी."
पुणे जिल्ह्यात धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाला आहे. पुणे जिल्ह्याच्या परिसरातील धरणे ३५% पेक्षा कमी भरली आहेत. त्यामुळे शहरात आतापासूनच पाणी टंचाई जाणवत आहे. उन्हाळयात अजून गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे शासनाला आतापासूनच पाण्याचे नियोजन करायला लागणार आहे.
Share your comments