शेताला रस्ता असणे फार गरजेचे असते.शेतमाल बाहेर काढणे, शेतात जाण्यासाठी तसेच यंत्रांचे ने आण करण्यासाठी रस्ता हा आवश्यक असतो.
राज्यातील गावागावात शेतरस्ते, पानंद रस्ते तयार करण्यासाठी मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पानंद रस्ते योजना राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
सद्यस्थिती मध्ये राज्यात पालकमंत्री शेत पाणंद रस्ते योजना राबवण्यात येत आहे. या योजनेमध्ये येणाऱ्या अडचणी बाजूला करून या योजनेतील कामांसाठी मनरेगाच्या माध्यमातून आवश्यक असलेला निधी उपलब्ध व्हावा यासाठी मनरेगा आणि राज्याची रोहयो यांचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे.
यामध्ये मनरेगाच्या माध्यमातून होणाऱ्या विविध कामांमधील हा कुशल व अकुशल च्या संयोजन आतून शेत पाणंद रस्ते बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या योजनेचे नामकरण मातोश्री ग्राम समृद्धी शेत पानंद रस्ते योजना असे करण्यात आले आहे. राज्याचा विचार केला तर राज्यामध्ये शेत पाणंद रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर गरज आहे.
रस्त्यां अभावी शेतकऱ्यांना तयार पीक बाहेर काढून साठवणे व बाजारात विकणे अवघड जाते. पावसाळ्यातील पिके आर्थिक दृष्ट्या फायदेशीर असले तरी रस्त्या अभावी तेपिकवण्याचा विचार करता येत नाही. पानंद रस्ते नसल्यामुळे शेतकऱ्यांना विविध पीक घेण्यात मोठा अडसर होतो.म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
Share your comments