गेल्या वर्षी या पावसाचा परिणाम हा बऱ्याच प्रकारचे पिकांवर दिसून येत आहे. कापूस आणि सोयाबीनचनाहीतर वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांच्या उत्पादनात बऱ्याच प्रमाणात घट झाली आहे.
याला बटाटा हे पीक देखील अपवाद नाही. जर आपण बटाटा पिकाचा विचार केला तर भारतामध्ये पश्चिम बंगाल राज्यात बटाट्याचे उत्पादन जास्त प्रमाणात घेतले जाते. परंतु तेथेही अवकाळी पावसामुळे बटाटा पिकाचे लागवड फार उशीर झाल्याने त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम दिसून येत असून उत्पादन बऱ्याच प्रमाणात घटले असून याबाबतचे वृत्त ऍग्रोवनने दिले आहे.
पश्चिम बंगालमधील बटाट्याचे स्थिती
पश्चिम बंगाल मध्ये अवकाळी पावसाने बटाट्याच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होऊन बटाट्याच्या उत्पादनात तब्बल 20 टक्क्यांनी घट झाली असून 85 ते 90 लाख टन एवढे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. कारण पावसामुळे लागवडीला देखील उशीर झाल्याने हीघट आलीआहे. मागच्या वर्षी चा विचार केला तर पश्चिम बंगालमध्ये बटाट्याचे बंपर उत्पादन झाले होते.जर बटाट्याच्या घाऊक बाजाराचा विचार केला तर बटाट्याच्या पोकराज वरायटीचे बाजारातील दर हे 140 टक्क्यांनी वाढले असून तब्बल 1 हजार 200 रुपये प्रति क्विंटल झाले आहेत.
जर या दराची तुलना मागच्या वर्षीच्या दरांची केली तर ते मागच्या वर्षी फारच कमी होते. मागच्या वर्षी हे दर पाचशे ते साडेपाचशे रुपये प्रति क्विंटल होते. पश्चिम बंगालमधील या उत्पादन घटनेचा परिणाम हा बटाट्याच्या किमतींवर दिसून येईल असे फेडरेशन ऑफ कोल्डस्टोरेज असोसिएशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष आशिष गुरु यांनी सांगितले आहे.
आग्रा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बटाट्याची स्थिती
जर भारतातील बटाट्याच्या बाजाराचा विचार केला तर सर्वात मोठ्या बाजारा पैकी एक असलेल्या आग्रा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सद्यस्थितीत बटाट्याचे दर हे 780 ते 800 रुपये प्रति क्विंटल असे आहेत. या ची तुलना मागच्या वर्षीच्या कालावधीची केली तर या बाजार समितीमध्ये हे दर 200 रुपयांनी कमी होते.
उत्तर प्रदेश राज्यातील बटाटा आवकेचा विचार केला तर 23 फेब्रुवारीपर्यंत 59396 टनांची बटाट्याची आवक झाली. तसेच मागच्या वर्षीच्या तुलनेत कोल्डस्टोरेज चे लोडिंग चे दर हे 60 टक्क्यांनी वाढून 15 ते 16 रुपये प्रति किलो झाले आहेत. पश्चिम बंगालमधील हुगळी, मिदनापूर, बांकुरा आणि बर्दवान या प्रमुख बटाटा उत्पादक जिल्ह्यांमध्ये बटाट्याची जवळजवळ 55 ते 60 टक्के पेरणी पूर्ण झाली होती परंतु जव्वादचक्रीवादळाचा तडाखा बसल्याने उत्पादनात घट आली.
( स्त्रोत-ॲग्रोवन)
Share your comments