1. बातम्या

ज्वारीची ससेहोलपट सुरूच! मिळत आहे हमीभावापेक्षा ही खूपच कमी भाव

ज्वारी हे महत्वपूर्ण पीक असून आरोग्याला देखील खूपच लाभदायक आहे. यावर्षी सगळ्याच पिकांना चांगला बाजार भाव आहे. जर सोयाबीन आणि कापूस तसेच तूर पिकाचा विचार केला तर या पिकांना हमी भावापेक्षाही अधिकचा दर मिळत आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
jwaar crop

jwaar crop

ज्वारी हे महत्वपूर्ण पीक असून आरोग्याला देखील खूपच लाभदायक आहे. यावर्षी सगळ्याच पिकांना चांगला बाजार भाव आहे. जर सोयाबीन आणि कापूस तसेच तूर पिकाचा विचार केला तर या पिकांना हमी भावापेक्षाही अधिकचा दर मिळत आहे.

परंतु या पिकांच्या तुलनेत ज्वारी पिकाचा विचार केला तर ज्वारीच्याभावाची परिस्थिती खूपच खालावलेली आहे.

 ज्वारी पिकाला शासनाचा दोन हजार 738 रुपये हमीभाव असतानादेखील ज्वारीला केवळ 1000 ते 1300 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. तसे पाहायला गेले तर ज्वारीची उपयुक्तता पाहिली तर आहारमध्ये ज्वारीचे फारच महत्त्व आहे. ज्वारी ही पचायला हलकी तसेच पोषक व सकस असून ज्वारीच्या भाकरीचा आणि ज्वारी पासून तयार केलेल्या पदार्थांचा उपयोग आहारात  करण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देखील देतात.

ज्वारी च्या पिठापासून थालीपीठ, भाकर, उपमा तसेच खानदेशात कळण्याच्या भाकरी,ज्वारीचे पापड, ज्वारीचे पीठ आंबवून केलेले धिरडे तसेच लाह्या असे अनेक पदार्थ आवर्जून आवडीने तयार केले जातात.इतके  महत्त्वपूर्ण असलेल्या  या पिकाला बाजार भावाच्या बाबतीत मात्र इतर पिकांपेक्षा दुय्यम स्थान मिळत असल्याचे चित्र सध्या आहे.एकेकाळी ज्वारी ला आहारा  मध्ये खूपच महत्त्व होते. परंतु कालांतराने ज्वारीची जागा गव्हा णे घेतल्याने ज्वारीचा आहारात उपयोग कमी झाला व गव्हाचा उपयोग सर्वाधिक होऊ लागला. 

त्यामुळे ज्वारीचा पेरा खूपच कमी झाला. उत्पादन कमी व मागणी अधिक असते तेव्हा बाजारांमध्ये भाव वाढतात.  परंतु हा नियम ज्वारीच्या बाजार भावाच्या बाबतीत लागू होताना दिसत नाहीये. उत्पादन कमी असताना सुद्धा भावात मात्र सातत्याने घसरण होत आली आहे. 2738 रुपये हमीभाव असताना देखील बाजार समित्यांमध्ये हमीभावाच्या निम्मेच भाव ज्वारी उत्पादकाला मिळत आहे.

English Summary: market rate continue decrease of jwaar crop in market than other crop Published on: 20 January 2022, 04:06 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters