आपल्या देशात गाजा समवेतच अन्य अनेक अंमलीय पदार्थांचे विक्री तसेच उत्पादन करणे कायद्याने प्रतिबंधित करण्यात आले आहे. गांजा शेती देशात सर्वत्र प्रतिबंधित असून सुद्धा राज्यात अनेक शेतकरी गांजाचा मळा फुलवण्याचा प्रयत्न करतात. काही महिन्यांपूर्वी मराठवाड्यात गांजाची शेती केल्याप्रकरणी शेतकऱ्यांवर कारवाईचा बडगा उठवण्यात आला होता. मात्र तरीदेखील काही शेतकरी गांजाचा शेती करण्याचा अवाजवी निर्णय घेताना दिसत आहेत.
हाती आलेल्या माहितीनुसार, गांजाची शेती आता पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात बघायला मिळत आहे. जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी गावातील रहिवासी शेतकरी यांनी चक्क आपल्या उसाच्या फडात आंतरपीक म्हणून गांजाचा मळा फुलवला होता. सैनिक टाकळी येथील सदाशिव कोळी यांनी उसाच्या फडात गांजाची सुमारे 500 रोपांची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. उसाच्या फडात गांजा लागवड केली असता सहजासहजी लक्षात येत नसल्याने पश्चिम महाराष्ट्रातील या शेतकऱ्याने हा नसता उद्योग केल्याचे समोर येत आहे. सध्या परिसरात ऊस तोडीचे काम ऐरणीवर आहे आणि ऊस तोड झाल्यानेच संबंधित प्रकार उघड झाल्याचे समोर येत आहे. पोलिसांना सुत्रांद्वारे माहिती मिळताच, पोलिसांनी सदाशिव कोळी यांच्या घरावर छापा टाकून सुमारे 490 गांज्याची रोपे जप्त केली आहेत, तसेच लाखो रुपयांचा मुद्देमाल देखील पोलिसांनी यावेळी ताब्यात घेतल्याचे समजत आहे. या समवेतच पोलिसांनी कारवाई करत आरोपी सदाशिव याला ताब्यात घेत कुरदवाडी पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली जाते, कोल्हापूर जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात उसाची शेती शेतकऱ्याद्वारे केली जाते. उसाच्या फडात गांजाची रोपे निदर्शनात येत नाही म्हणून, येथील शेतकरी सर्रासपणे गांजाची लागवड करत असतात. सैनिक टाकळी येथेदेखील एका शेतकऱ्याने उसाच्या फडात गांजाचा मळा फुलवला होता, याबाबत पोलिसांना त्यांच्या गुप्त सूत्राद्वारे माहिती मिळताच संबंधित शेतकऱ्यांच्या उसाचा फडावर छापा टाकला आणि पोलिसांना उसाच्या फडात गांजाचे मळे आढळून आले. पोलिसांनी संबंधित शेतकऱ्याच्या घरावर देखील छापा टाकला आणि पोलिसाला तेथे लाखो रुपयांचा मुद्देमाल आढळला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
शेतकरी मित्रांनो गांजाची शेती ही देशात कायद्याने प्रतिबंधित करण्यात आली असल्याने गांजा शेतीचा अवाजवी प्रयोग करू नये. यामुळे विनाकारण आपण अडचणीत सापडू शकता. असे कृत्य केल्याने आपण येणाऱ्या भविष्यातील पिढीला चुकीचा संदेश देत असतो. त्यामुळे आपण शेती क्षेत्रात आपल्या कष्टाच्या जोरावर नवनवीन नाविन्यपूर्ण योजना अमलात आणाव्यात आणि आपले व देशाचे नाव जगाच्या पाठीवर आदराने घेतील यासाठी सदैव प्रयत्नरत राहावे. आगामी काही दिवसात या संपूर्ण भारत वर्षात निश्चितच बळीचे राज्य येणार आहे म्हणून आपण त्यासाठी योग्य व नैतिक विचारांचा पगडा आपल्या माथी बांधावा.
Share your comments