1. बातम्या

Kj Chaupal : कृषी जागरणच्या मंचावर मारियानो बेहरान; शेती क्षेत्राबाबत उपस्थितांना मार्गदर्शन

कृषी जागरणच्या केजे चौपाल कार्यक्रमात अनेक प्रमुख व्यक्तींना आमंत्रित केले जाते. आज (दि.१२) रोजी अर्जेंटिना येथील कृषी संलग्न दूतावासाचे मारियानो बेहरान (Mariano Beheran) यांना आमंत्रित करण्यात आले होते.

Kj Chaupal Update

Kj Chaupal Update

New Delhi : शेती आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने कृषी क्षेत्रात अधिकाधिक सुधारणा करण्यासाठी गेल्या २७ वर्षापासून कृषी जागरण काम करते आहे. ही अभिमानाची आणि कौतुकास्पद गोष्ट आहे, असं मत अर्जेंटिना येथील कृषी संलग्न दूतावासाचे मारियानो बेहरान (Mariano Beheran) व्यक्त केलं आहे. कृषी जागरणच्या केजे चौपाल कार्यक्रमात ते बोलत होते.

कृषी जागरणच्या केजे चौपाल कार्यक्रमात अनेक प्रमुख व्यक्तींना आमंत्रित केले जाते. आज (दि.१२) रोजी अर्जेंटिना येथील कृषी संलग्न दूतावासाचे मारियानो बेहरान (Mariano Beheran) यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी शेती क्षेत्रात होणारे बदल याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. बेहारन हे कृषी व्यवसायातील एक प्रमुख व्यक्तिमत्व आणि शेतीच्या जगात महत्त्वाकांक्षी व्यक्ती आहेत. ते आज कृषी जागरण परिवारात सहभागी झाले होते.

यावेळी कृषी जागरणचे संस्थापक आणि मुख्य संपादक एम.सी. डोमिनिक यांनी बेहरान यांचे स्वागत केले. तसंच संस्थेच्या वतीने बेहरान आणि कृषीतज्ज्ञ कमलेश मिश्रा यांचा सत्कार करण्यात आला.

मनोगत व्यक्त करताना डोमिनिक म्हणाले की, अनेक कृषी प्रकल्पांसह अपवादात्मक संवाद आणि अंतर्गत-बाह्य संबंध-निर्माण कौशल्ये आहेत. त्याला अर्जेंटिना आणि इतर बाजारपेठांमध्ये उत्पादक कृषी व्यवसायाच्या अनेक पैलूंचा अनुभव आहे. पारंपारिक पीक, गायींचे अनुवांशिक प्रजनन आणि दुग्ध उद्योगातील शेती यासह अनेक व्यावसायिक क्रियाकलापांचा ठोस अनुभव आहे.

English Summary: Mariano Beheran on Agriculture platform Forum Guidance to the attendees about the agriculture sector Kj Chaupal Published on: 12 October 2023, 05:53 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश चंद्रकांत काळंगे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters