सततचा दुष्काळ म्हणून ओळख असलेला मराठवाड्याची भूजल पातळीत (Marathwada Ground Water Level) 2 मीटरने वाढली आहे. त्यामुळे यंदा मराठवाड्यातील पाणी प्रश्न मिटला असून, विभाग टँकरमुक्त राहणार आहे. यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे. मराठवाड्यात यंदा पाऊस मनसोक्त बरसला. अनेक ठिकाणी पूर देखील आला.
ऑक्टोबर-सप्टेंबर महिन्यात परतीच्या पावसाने तर अक्षरशः धुमाकूळ घातला. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील झाले होते. असे असताना यंदा मराठवाड्यातील पाणी प्रश्न मिटला असून, विभाग टँकरमुक्त राहणार आहे. सप्टेंबर अखेर झालेल्या सर्वेक्षणात विभागाच्या भूजल पातळीत सरासरी 2 मीटरची वाढ झाली आहे. सर्वाधिक 3.22 मीटरची वाढ परभणीत जिल्ह्यात झाली आहे.
दरम्यान, गेली तीन वर्ष मराठवाड्यात सतत अतिवृष्टी (Heavy Rain) होत आहे, तसेच यंदाही जोरदार पावसाने हजेरी लावली. विभागात पडलेल्या दमदार पावसामुळे लघु, मध्यम आणि मोठे प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. अनेक नद्यांना पूर आले होते. यामुळे जनजीवन देखील विस्कळीत झाले होते.
चालू आर्थिक वर्षात भारतीय कृषी उत्पादनांच्या निर्यातीत 25 टक्क्यांनी वाढ
मराठवाड्यात नेहमीच पाणी टंचाई पाहायला मिळते. मात्र गेल्या तीन वर्षात परिस्थिती बदलताना पाहायला मिळाली. यावर्षी मे महिन्यात मराठवाड्यात ५९ टँकरने विविध गाव, तांडे आणि वस्त्यांना पाणीपुरवठा केला जात होता. पण आता मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भूजल पातळीत वाढ झाली असल्याने पाणी प्रश्न मिटला आहे. यामुळे हे टँकर बंद होतील.
फलोत्पादन शेत्रातल्या योगदानाबद्दल शेतकऱ्यांचा कृषी मंत्र्यांच्या हस्ते सत्कार
त्यामुळे यंदा मराठवाडा टँकरमुक्त पाहायला मिळणार आहे. असे असताना प्रत्यक्षात मात्र याबाबत उन्हाळ्यात खरी परिस्थिती समोर येईल. आता मात्र या अहवालामुळे सध्या तरी दिलासा मिळाला आहे, शेतकऱ्यांना पिकांना याचा फायदा होणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
आता लम्पीनंतर घोड्यांमध्ये ग्लेंडर्स रोगाचा शिरकाव, माणसांना देखील धोका,संसर्ग झाल्यास थेट मृत्यू..
'साखर कारखाने काट्यामध्ये शेतकऱ्यांचा ऊस लुटतात'
गव्हाच्या दरात मोठी वाढ! प्रति क्विंटल 900 रुपयांपर्यंत झाली वाढ..
Share your comments