1. बातम्या

Maratha Reservation : मराठा आरक्षणाची धग लालपरीला; बससेवा ठप्प, मोठे आर्थिक नुकसान

कोरोनानंतर एसटी कर्मचारी त्यांच्या मागण्यांसाठी काम बंद आंदोलन केले होते. जवळपास हे कामबंद आंदोलन महिनाभर चालले होते. त्यामुळे देखील एसटी महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला होता. तो आता कुठे स्थिर होताना दिसत असताना मराठा आंदोलनामुळे पुन्हा बससेवा बंद करण्यात आली आहे.

Bus service stopped news

Bus service stopped news

Pune News : राज्यात मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. सुरुवातीला शांततेत सुरु असणाऱ्या आंदोलनाने आता हिंसक रुप घेतलं आहे. मागील काही दिवसांपासून मराठा समाजाकडून रस्त्यावर आंदोलन सुरु आहे. आंदोलनादरम्यान बहुतांश भागात जाळपोळ झाली असून यात लालपरीला लक्ष करण्यात आले आहे. यामुळे याचा सर्वात जास्त फटका आता लालपरीला बसू लागला असल्याने अनेक भागातील बससेवा प्रशासनाने बंद केली आहे. यामुळे लालपरीला आतापर्यंत १८ ते २० कोटींचा आर्थिक फटका बसला आहे.

कोरोनानंतर एसटी कर्मचारी त्यांच्या मागण्यांसाठी काम बंद आंदोलन केले होते. जवळपास हे कामबंद आंदोलन महिनाभर चालले होते. त्यामुळे देखील एसटी महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला होता. तो आता कुठे स्थिर होताना दिसत असताना मराठा आंदोलनामुळे पुन्हा बससेवा बंद करण्यात आली आहे. यामुळे महामंडळाला जवळपास आतापर्यंत २० कोटींचा फटका बसला आहे.

राज्यभरात ठिकठिकाणी मराठा समाज आक्रमक आहे. तीव्र आंदोलन, जाळपोळ सुरु आहे. यामुळे याचा एसटीला फटका बसत आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला आगारातून जवळपास १३२ बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहे. यामुळे महामंडळाचे आर्थिक नुकसान झाले आहे. बस फेऱ्या रद्द झाल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांनाही त्याचा फटका बसला आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या या आंदोलनाची झळ एसटी बसेसला बसत आहे. एसटी बसने रोज हजारो प्रवाशी प्रवास करत असतात. त्यात सणासुद तोंडावर असल्याने प्रवाशांची एसटीला चांगली पसंदी असते. मात्र सध्या बससेवा बंद असल्याने याचा मोठा फटका लालपरीला बसणार आहे. एसटी बसेसची जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. यामुळे लालपरीची सेवा ठप्प झाली आहे.

दरम्यान, मराठा समाज मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेला आहे. लातूर आणि बीड जिल्ह्यात जाळपोळीच्या घटना वाढल्या आहेत. मराठवाड्यात जवळपास १०० पेक्षा अधिक बस जाळण्यात आलेल्या आहेत. यामुळे पुणे, शिवाजीनगर बसस्थानकावरुन मराठवाड्यातील अनेक भागात जाणाऱ्या आणि येणाऱ्या एसटी बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे पुणे शहरातून मराठवाड्यात जाणाऱ्या प्रवाशांची चांगलीच अडचण झाली आहे.

English Summary: Maratha Reservation Bus service stopped huge financial loss Published on: 02 November 2023, 01:07 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters