यावर्षी साखर कारखान्यांचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना देखील अजूनही बराच ऊस फडातचशिल्लक आहे. यामध्ये जर लातूर व जालना तसेच उस्मानाबाद या मराठवाड्यातील जिल्ह्यांचा विचार केला तर शिल्लक उसाचा प्रश्न हा गंभीर आहे.
दोन कोटी टन उसाचे गाळप मराठवाडा विभागात होऊन देखील अतिरिक्त ऊस अजूनही आहे. आता प्रश्न पडतो की याला जबाबदार नेमकी कारखान्यांना धरायचे की शेतकऱ्यांना. हेही तितकेच महत्त्वाचे आहे. परंतु जर यामध्ये बारकाईने विचार केला तर या गोष्टीला कारखाने जबाबदार आहेत असे धरूनही चालणार नाही. कारण उसाच्या लागवड क्षेत्रात देखील प्रचंड वाढ झालेली आहे. मराठवाड्याचा विचार केला तर 36 साखर कारखान्यांनी त्यांच्या क्षमतेपेक्षा देखील अधिकचे गाळप केले आहे परंतु तरीदेखील अतिरिक्त उसाचा प्रश्न आहे तो तसाच आहे. आता जो काही ऊस शिल्लक आहे त्याच्या वजनामध्ये आणि उत्पादनात घट होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मराठवाड्यामध्ये जवळजवळ 59 साखर कारखाने सुरू होते. परंतु उसाचे उत्पादन आणि क्षेत्र या दोन्ही मध्ये देखील वाढ झाल्याने त्याचा सरळ परिणाम हा गाळपावर झाला. तसेच अवकाळी पाऊस व बदलते वातावरण याचा देखील ऊस तोडणी मध्ये अडथळा निर्माण झाला होता. गेल्या पाच महिन्यांपासून उसाचे गाळप सुरू आहे व ते मेच्या शेवटपर्यंत चालेल असा एक अंदाज आहे
बऱ्याच मराठवाड्यातील कारखान्यांनी त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त उसाचे गाळप केले परंतु उसाच्या क्षेत्रात वाढ झाल्याने झाल्याने अतिरिक्त गाळप करून देखील ऊस शेतात शिल्लक आहे. यामध्ये जवळ-जवळ मराठवाड्यातील अकरा कारखान्यांनी अधिकची गाळप केले आहे. तसेच शेतकऱ्यांनी देखील लागवडी दरम्यान जी आवश्यक नोंदणी असते ती केली नसल्याचे देखील समोर आले आहे. त्यामुळे या अतिरिक्त उसाचा प्रश्न यामुळे नेमके कारखान्यांना जबाबदार धरावे की शेतकऱ्यांना हादेखील एक मोठा प्रश्न आहे.
सध्याची मराठवाड्यातील कारखान्यांची स्थिती
मराठवाड्यात या हंगामात 59 साखर कारखाने सुरू असून हे सगळे कारखाने मिळून दोन कोटी टन उसाचे गाळप केले आहे.तसेच या सगळ्या कारखान्यांनी मिळून उत्पादित साखरेचा विचार केला तर ते दोन कोटी 43 लाख टन इतके आहे. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील 13 आणि लातूर जिल्ह्यातील दहा साखर कारखाने हे सर्वाधिक गाळप करणारे व साखरेचे सर्वात जास्त उत्पादन करणारे कारखाने ठरले आहेत.
Share your comments