नुकताच पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा दहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला. आपल्याला माहित आहेच की या योजनेच्या माध्यमातून वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्प्यात विभागून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येतात.
परंतु शेतकऱ्यांच्या काही चुकांमुळे संबंधित हप्ता जमा होण्यास अडचणी निर्माण झाले आहेत. जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर जळगाव जिल्ह्यात पी एम किसान योजनेचे पाच लाख लाभार्थी असून यातील सुमारे जवळजवळ एक लाख शेतकरी त्यांच्या खाते क्रमांक आतील बदल, बँक खाते आधार लिंक नसणे आधी कारणांमुळे मिळणाऱ्या निधी पासून वंचित राहतील अशी परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर असलेल्या दुरुस्त्या व अडचणी सोडवण्यासाठी कृषी व महसूल विभागात समन्वय घडवून आणावा, यासाठी शासनाने कार्यवाही करावी अशी मागणी जळगाव लोकसभा क्षेत्राचे खासदार उन्मेश पाटील यांनी केले आहे.
जळगाव जिल्ह्यात अडीच लाख लाभार्थी शेतकरी असून या योजनेचा निधी नियमित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येत आहे. त्याचा बराचसा आधार शेतकऱ्यांना होत आहे पण जळगाव जिल्ह्यात काही महिन्यांपूर्वी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे खाते क्रमांक बदलले आहेत. जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक या योजनेचे लाभार्थी शेतकरी जिल्हा बँकेच्या खात्या द्वारेच या योजनेचा निधीचा लाभ घेत होते. पण खाते क्रमांकात बदल करण्यात आल्याने नववा हप्ता अनेक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात आलाच नाही. तसेच बऱ्याच शेतकऱ्यांचे बँक खाते आधार लिंक नाही त्यामुळे देखील संबंधित शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले. या अडचणी दूर करण्याची कार्यवाही करण्यासाठी पोर्टलवर लॉगिन करावे लागते.
सी एस सी किंवा शेतकरीही दुरुस्ती घरबसल्या करू शकत नाही. त्यासाठी लॉग इन आयडी आणि पासवर्ड प्रशासनाकडे म्हणजेच महसूल विभागाकडे आहेत. पण हे महसूल विभाग हे कामकाज करीत नाहीत त्यावर बहिष्कार टाकल्याचे तहसील कार्यालयातून सांगितले जाते. या सगळ्या कारणांमुळे पी एम किसान योजनेचे काम रखडले आहे. या कामांसाठी शेतकरी बँका, तहसील कार्यालयात चकरा मारत आहेत परंतु काम होत नाही. याबाबतीत कृषी विभाग म्हणतो की पीएम किसान बाबत आम्हाला शासनाचे आदेश, लॉग इन आयडी आणि पासवर्ड नाही त्यामुळे या योजनाबाबत मोठी कोंडी शेतकऱ्याचीकरण्यात आली आहे. (संदर्भ-ॲग्रोवन)
Share your comments