अगोदरच खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम हातचा गेल्याने आता पुन्हा अवकाळी पावसाने एन्ट्री केल्यामुळे शेतकरी पुरतेहवालदिल झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात बुधवारपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाने जमिनीत उभा असलेला लाल कांद्याचे तर नुकसान केले परंतु वेचणी ला आलेला कापूस भिजून कापसाची प्रत प्रचंड प्रमाणात खालावली आहे.
तसेच द्राक्ष बागांमध्ये गड कुछ होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
नाशिक जिल्ह्यातील येवला आणि मालेगाव तालुक्यामध्ये सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाल्यानेवेचणीला आलेला कापूस पावसाने भिजून तो काळा पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हा परत खालावलेला कापूस आहे त्या भावात विकण्या शिवाय पर्याय नाही.तसेच द्राक्ष बागांमध्ये पाणी साचल्यामुळे घड कुज व डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तसेच फुलोऱ्यातील द्राक्ष मण्यांची गळ होत आहे. या पावसाचा फटका हा रब्बी हंगामात पेरलेल्या गहू आणि हरभरा या पिकांना देखील बसला आहे. अगोदरच यावर्षी परतीच्या पावसाने फार मोठे नुकसान केले होते.
त्या झटक्यातून शेतकरी सावरत नाही तोच परत एकदा बिगरमोसमी पावसाने पुन्हा एक झटका शेतकऱ्यांना दिला आहे.जर येवला आणि मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा विचार केला तर खरीप हंगामातील मका, कापूस इत्यादी महत्त्वाच्या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होऊन पूर्ण गणित बिघडले होते. त्यातच आता आलेल्या या बिगरमोसमी पावसाने कापसाचे आणि लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे तसेच पुढील उन्हाळी कांद्यासाठी टाकलेल्या रोपवाटिका वर या बिगरमोसमी पावसामुळे रोगांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असल्याने शेतकरी प्रचंड चिंतेत आहेत.
लाल कांदा आता काढणीला आलेला असताना आलेल्या या बिगरमोसमी पावसामुळे जमिनीत सडत असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यासोबतच उन्हाळी कांद्याची रोपे देखील पावसाने खराब होत आहेत.. अशा या प्रतिकूल वातावरणात कांदा पीक आणि कांद्याची रोपे टिकवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फवारणी करावी लागत असल्याने शेतकऱ्यांच्या खर्चात प्रचंड वाढ होत आहे. तीस परिस्थीती द्राक्ष बागायतदारांच्या असून द्राक्ष उत्पादक शेतकरीही बदलत्या हवामानामुळे पुरते हबकून गेले आहेत.
Share your comments