1. बातम्या

Mansoon Update: 3 जूनला मान्सूनचं राजधानी मुंबईत आगमन ठरलेलचं; वाचा सविस्तर

गेल्या अनेक दिवसांपासून देशात सर्वत्र मान्सून (Mansoon) विषयी मोठ्या चर्चा रंगल्या आहेत. हवामान विभागाने (Indian Meteorological Department) मान्सून या वर्षी लवकर धडकणार असल्याचे स्पष्ट केले असल्याने शेतकऱ्यांसमवेतच (Farmers) सामान्य नागरिकांमध्ये कमालीचे आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
Pre Mansoon Rain

Pre Mansoon Rain

गेल्या अनेक दिवसांपासून देशात सर्वत्र मान्सून (Mansoon) विषयी मोठ्या चर्चा रंगल्या आहेत. हवामान विभागाने (Indian Meteorological Department) मान्सून या वर्षी लवकर धडकणार असल्याचे स्पष्ट केले असल्याने शेतकऱ्यांसमवेतच (Farmers) सामान्य नागरिकांमध्ये कमालीचे आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे.

मित्रांनो खरे पाहता दरवर्षी मान्सून हा 10 जूनच्या सुमारास राजधानी मुंबईत (Mumbai Mansoon Update) प्रवेश घेत असतो. मात्र यावर्षी मान्सून साठी अनुकूल वातावरण असल्याने मान्सूनचे आगमन राजधानी मुंबईत जवळपास सात दिवस लवकर म्हणजेच तीन जूनच्या आसपास होणार असल्याचे भाकीत हवामान विभागाने वर्तवल आहे.

मित्रांनो गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यातील हवामानात मोठा बदल झाला असून पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने (Pre Mansoon Rain) दस्तक दिली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर सोलापूर आणि विदर्भातील काही तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी बघायला मिळाली.

यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून मोठ आल्हाददायक वातावरण बघायला मिळत आहे. एवढेच नाही तर येत्या तीन दिवसात राज्यातील अनेक ठिकाणी पुन्हा एकदा मान्सूनपूर्व पाऊस बरसणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

भारतीय हवामान विभागाच्या मते, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, अहमदनगर, सांगली, कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच राजधानी मुंबईत व खानदेशमधील धुळे, नंदुरबार, जळगाव व विदर्भातील यवतमाळ, या जिल्ह्यांत मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण आणि विदर्भातील काही भागात पुढील तीन दिवस विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना व मान्सून पूर्व पाऊस बसणार आहे. यामुळे कोकण विदर्भ वासियांना उकाड्यापासून आराम मिळणार आहे.

निश्चितच मान्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांच्या आशा देखील पल्लवित केल्या आहेत. एवढेच नाही तर मुंबईमध्ये मान्सूनचे लवकर आगमन होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये कमालीचे समाधान यावेळी बघायला मिळाले. मान्सून यावर्षी वेळे आधीच महाराष्ट्रात दाखल होणार असल्याने यावर्षी शेतकरी राजा खरिपाचे नियोजन करण्यासाठी लगबग करत असल्याचे बघायला मिळत आहे.  

English Summary: Mansoon Update: Monsoon arrives in Mumbai on June 3; Read detailed Published on: 25 May 2022, 03:00 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters