भारतात शेती ही मौसमी प्रकारची आहे म्हणजे पावसावर आधारित आणि जवळपास निम्म्याहून अधिक भागातील शेतीवर पावसाचा सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम पडतो. आता पावसाचा परतीचा दौरा सुरु होणार आहे आणि त्यासंबधी भारतीय हवामान खात्याने अंदाज देखील बांधलाय. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) म्हटले आहे की, बुधवारपासून उत्तर-पश्चिम भारताच्या काही भागातून नैऋत्य मान्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी परिस्थिती अनुकूल आहे.
आयएमडीच्या राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्राचे वरिष्ठ अधिकारी आर के जेनमानी यांच्या म्हणण्यानुसार, जवळपास 1960 नंतर नैऋत्य मान्सून, परतीचा पाऊस उशिरा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 2019 मध्ये, उत्तर-पश्चिम भारतातून मान्सूनची वापसी 9 ऑक्टोबरपासून सुरू झाली होती. उत्तर-पश्चिम भारतातून नैऋत्य मान्सूनची वापसी ही साधारणपणे 17 सप्टेंबरपासून सुरू होते. पण यंदा मात्र परतीच्या पाऊसाची सुरवात उशिरा होताना आपल्याला दिसत आहे.
त्याचबरोबर भारतीय हवामान खात्यानुसार बुधवारी सकाळी उत्तर प्रदेशातील बहजोई, सहसवान, कासगंज, गंजदुंदवाडा, एटा, खुर्जा, गबानासह इतर अनेक ठिकाणी पाऊस पडेल. हवामान खात्याच्या मते, बुधवारी उत्तर प्रदेशच्या अनेक भागात पाऊस पडू शकतो. यासोबतच हवामान अंदाज बांधणारी स्कायमेट वेदरनेही बुधवारी अनेक राज्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
स्कायमेंटचा अंदाज अपना-अपना
स्कायमेट वेदरनुसार, अंदमान आणि निकोबार बेटे, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि लक्षद्वीपच्या बहुतांश भागात बुधवारी पावसाची शक्यता आहे. याशिवाय, ईशान्येकडील राज्ये, पश्चिम बंगाल, सिक्कीम, मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटकचा किनारी भाग, छत्तीसगड, रायलसीमा आणि उत्तर प्रदेशच्या बहुतांश भागात बुधवारी चांगला पाऊस पडू शकतो.
महाराष्ट्र संदर्भात काय सांगितलं स्कायमेटने
स्कायमेंट वेदरच्या हवामान अंदाजानुसार, आपल्या महाराष्ट्रात 9 ऑक्टोबरपर्यंत मुंबई आणि त्याच्या आसपासच्या भागात तसेच कोकण भागात हलका ते मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. तसेच आज विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ष्ट्रात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत नैऋत्य मोसमी हंगामात देशात 'सामान्य' पाऊस झाला.
सर्वासामान्य पाऊस...
एकंदरीत परतीच्या पावसाची लगबग बुधवारपासून सुरु होईल आणि आपल्या महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, कोकण, मुंबई तसेच मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात पावसाची शक्यता राहील.
देशात सर्वसाधारणपने सामान्य पाऊस झाल्याचे म्हटले जात आहे जे की चांगले संकेत आहे पण महाराष्ट्रातील काही भागात अद्यापही पाऊस सामान्य पडलेला नाही तसेच काही भागात हा पाऊस स्माण्यापेक्षा जास्त पडला आणि तिथे अतिवृष्टी सारखी परिस्थिती झाली त्यामुळे त्या भागातील शेतीचे, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
Share your comments