देशातील शेतकरी बांधव (Farmers) तसेच सामान्य नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून मान्सूनची (Mansoon Rain) मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. मध्यंतरी भारतीय हवामान विभागाने यावर्षी मान्सून (Mansoon 2022) लवकर दाखल होणार असल्याचे सांगितले होते.
मात्र सध्या मान्सूनसाठी अनुकूल वातावरण नसल्याने मान्सूनचे आगमन उशिरा होणार असून जनतेला अजून काही काळ मान्सूनची वाट पाहावी लागणार आहे. यामुळे जनतेस अजून काही काळ उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार आहे.
भारतीय हवामान विभागाच्या (Indian Meteorological Department) अंदाजानुसार, यावर्षी मान्सून हा तब्बल एक आठवडा लवकर केरळ मध्ये प्रवेश करणार होता. म्हणजेच मान्सून हा मे च्या शेवटी 27 मे ला केरळ गाठणार होता मात्र आता यामध्ये मोठा बदल झाला असून मान्सूनचे आगमन चार दिवस उशिरा केरळमध्ये होणार आहे.
भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या ताजा अंदाजानुसार, मान्सून एवढ्या दोन दिवसांत दक्षिणपूर्व अरबी समुद्र, मालदीव, कौमारिनचा प्रदेश, दक्षिण पूर्व तसेच मध्य व ईशान्य बंगालचा उपसागरात आपली दस्तक देणार आहे. एकंदरीत काय भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या आता अंदाजानुसार आता मान्सून हा 27 मे रोजी केरळमध्ये दाखल होणार नाहीये.
खरं पाहता, मान्सून हा दक्षिण पश्चिम बंगाल आणि केरळ या दोन्ही ठिकाणी एकाच दिवशी दाखल होतं असतो. मात्र आता मान्सूनच्या प्रवासात अडथळे येतं असल्याने 27 तारखेला मान्सून हा केरळ मध्ये दाखल होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हवामान विभागातील डॉ अनुपम कश्यप यांच्या मते, पाऊस झाला म्हणजे मान्सून दाखल झाला असं म्हणणं कदापि योग्य नाही. त्यांच्या मते, मान्सून साठी काही निकष घातलेले आहेत. ते निकष पूर्ण झालेत म्हणजे खऱ्या अर्थाने मान्सून आला असं म्हणता येईल.
वातावरणातील वरच्या स्तरावरील पश्चिमी वारे खालील वाऱ्यासोबत एकत्र आले पाहिजे शिवाय त्यांचा ताशी वेग हा 40 असायला हवा एवढेच नाही तर 16 केंद्रापैकी सुमारे 60% केंद्रावर 2.5 मिलीमीटर पाऊस झाला पाहिजे. हे सर्व निकष पूर्ण झाले म्हणजे मान्सूनचे आगमन झाले असे म्हणता येईल. मान्सून येत्या दोन दिवसात अरबी समुद्रात तसेच बंगालच्या उपसागरात पुढे सरकण्याची शक्यता देखील यावेळी वर्तवण्यात आली आहे.
एकंदरीत हवामान विभागातील तज्ञ लोकांच्या मते, सध्या मान्सूनसाठी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे मान्सूनचे आगमन आधी सांगितलेल्या तारखे पेक्षा चार दिवस उशिराने होणार आहे. म्हणजेच मान्सूनचे केरळ मध्ये आगमन एक तारखेच्या आसपास होऊ शकते. निश्चितच मान्सून हा चार दिवस लांबणीवर पडल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.
Share your comments