Mansoon 2022 : भारतीय हवामान खात्याच्या हवाल्याने दिल्या जाणाऱ्या पावसाच्या लवकर आगमनाविषयीच्या बातम्या ह्या फसव्या असल्याच्या एका जेष्ठ हवामान तज्ञाच्या खुलासामुळे सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे. नुकत्याच दोन दिवसापूर्वी प्रसारमाध्यमात यंदा मान्सून 10 दिवस अगोदर भारतात दाखल होणार अशा बातम्या बघायला मिळाल्या.
विशेष म्हणजे ह्या बातम्या भारतीय हवामान विभागाच्या हवाल्याने देण्यात आल्या यामुळे शेतकरी बांधवामध्ये तसेच शेतीशी निगडित व्यवसायिकांमध्ये मोठं उत्साहाच वातावरण बघायला मिळाले. अनेकांनी लवकरच मान्सून दाखल होणार म्हणुन जय्यत तयारी सुरु केली.
महत्वाच्या बातम्या:
काय सांगता! शेतकऱ्यांना खत खरेदी करण्यासाठी मोदी सरकार देणार 11 हजार रुपये; वाचा
Medicinal Plant Farming : एका एकरात औषधी वनस्पतीची शेती करा आणि कमवा 6 लाख; वाचा याविषयी
शेतकऱ्यांनी देखील आगामी हंगामासाठी नियोजन आखायला सुरवात करून दिली आहे. मात्र आता मान्सून संदर्भात दिल्या जाणाऱ्या बातम्या खोट्या असून हवामान विभागाने असा अंदाज कधीच वर्तवला नाही असा दावा ज्येष्ठ हवामान तज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी स्पष्ट केले आहे.
कृष्णानंद सरांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करत स्पष्ट केले की, देशात मान्सून लवकर येण्याच्या बातम्या ज्या प्रसारमाध्यमांमध्ये मोठ्या रंगत आहेत त्या दिशाभूल करणाऱ्या आहेत. यामुळे जनतेने त्याकडे लक्ष न देता भारतीय हवामान खात्याचा अधिकृत अंदाजाकडे लक्ष द्यावे.
शिवाय कृष्णानंद सरांनी या अशा बातम्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते असे देखील मत व्यक्त केले आहे. मित्रांनो खरं पाहता भारतीय शेती ही सर्वस्वी पावसावर आधारित आहे. यामुळे मान्सूनची चाहूल लागताच बळीराजा शेतीकामासाठी लगबग करू लागतो.
यामध्ये पूर्व मशागतीपासून, बियाण्यांचे व्यवस्थापन करण्यापर्यंत ते खतांचा स्टॉक करण्यापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश असतो. मध्यंतरी प्रसार माध्यमांमध्ये मान्सून हा दिवस लवकर केरळच्या किनाऱ्यावर दस्तक देईल या बातमीमुळे बळीराजा मोठा सुखावला होता आणि त्याने पुढील हंगामासाठी आपली जय्यत तयारी सुरू केली होती.
यामुळे प्रसारमाध्यमांमध्ये हवामान विभागाच्या अहवालाने देण्यात आलेल्या बातमीमुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. मात्र यावर ज्येष्ठ हवामान तज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी वेळीच मार्गदर्शन केल्याने आणि हवामान विषयी प्रसारित केल्या जाणाऱ्या बातम्या फसव्या असल्याचे स्पष्ट करून दिल्याने निश्चितच यामुळे शेतकर्यांचे होणारे नुकसान टळले आहे.
Share your comments