1. बातम्या

Mansoon 2022: शेतकऱ्यांनो सुरु करा खरीपाची तयारी; मान्सून वेळेआधीच आगमनाच्या तयारीत; वाचा IMD चा ताजा अंदाज

राज्यातील नव्हे नव्हे तर संपूर्ण भारतातील शेतकरी बांधवांसाठी (Farmers) एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो भारतीय शेती (Farming) ही सर्वस्वी पावसाच्या पाण्यावर आधारित आहे. यामुळे दरवर्षी मान्सूनची (Mansoon 2022) आतुरतेने वाट बघितली जाते.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
Mansoon 2022

Mansoon 2022

राज्यातील नव्हे नव्हे तर संपूर्ण भारतातील शेतकरी बांधवांसाठी (Farmers) एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो भारतीय शेती (Farming) ही सर्वस्वी पावसाच्या पाण्यावर आधारित आहे. यामुळे दरवर्षी मान्सूनची (Mansoon 2022) आतुरतेने वाट बघितली जाते.

यावर्षी देखील शेतकरी बांधव मोठ्या आतुरतेने मान्सूनची वाट पाहत आहे. मात्र आता शेतकरी बांधवांसाठी एक दिलासा देणारी बातमी भारतीय हवामान विभागाच्या (Indian Meteorological Department) हवालानुसार समोर येत आहे.

भारतीय विभागाने नुकत्याच वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील चार आठवड्यात देशातील अनेक भागात पावसाची हजेरी (Rainfall Forecast) बघायला मिळणार आहे. यामुळे निश्चितच देशातील शेतकरी बांधवांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

मित्रांनो आज बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या असनी या चक्रीवादळाचा वेग कमालीचा मंदावला आहे. सध्या हे वादळ आंध्र प्रदेशच्या किनारी भागात कायम आहे. पुढील बारा तासात हे वादळ अजूनच कमकुवत होणार असल्याचा अंदाज आहे.

यादरम्यान नैऋत्य मोसमी वाऱ्याचा जोर दक्षिण अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागरात वाढला आहे. यामुळे वेळेआधी मान्सून येऊ शकतो असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

एकंदरीत काय असनी चक्रीवादळामुळे मान्सून वेळेपूर्वी दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. यामुळे निश्चितच उकाड्या पासून हैराण झालेल्या जनतेस लवकरच आराम मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

असनी चक्रीवादळ कमकुवत होतं आहे. यामुळे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे. यामुळे मान्सूनची चाहूल लवकरच बघायला मिळणार आहे. भारतीय हवामान विभागानुसार यामुळे अंदमानात मान्सून 17 मे रोजी तर केरळ मध्ये मान्सून 28 मे रोजी दाखल होण्याची दाट शक्यता बनली आहे.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की हवामान विभागाने याआधीच स्पष्ट केले आहे की या वर्षी मान्सून सामान्य राहणार आहे.

शिवाय यंदा सरासरीच्या 99 टक्के पाऊस बरसणार असल्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

English Summary: Mansoon 2022: Farmers start preparing for kharif; Preparing for the early arrival of the monsoon; Read the latest IMD forecast Published on: 12 May 2022, 07:10 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters