नवी मुंबई: भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी देशात मान्सून (Mansoon 2022) वेळेवर दाखल होणार आहे. हवामान अंदाज वर्तवणारी खासगी संस्था स्कायमेटने (Skymet Weather) देखील यावर्षी देशात मान्सून वेळेवर दाखल होणार असल्याचची भविष्यवाणी केली आहे.
भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, या वर्षी मान्सून मुहूर्त साधणार असून 15 मे रोजी अंदमान निकोबार मध्ये मान्सूनचा पहिला पाऊस हजेरी लावणार आहे.
15 मे रोजी मान्सून भारतात दाखल होईल तर 25 मे पर्यंत यंदाचा मान्सून हा केरळमध्ये येणार आहे. केरळ मध्ये आल्यानंतर मान्सून एका आठवड्यानंतर म्हणजे एक जून रोजी महाराष्ट्रात दाखल होणार असल्याची दाट शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.
यामुळे निश्चितच महाराष्ट्रातील जनता उकाड्यापासून मुक्त होणार असल्याचे सांगितले जात असून यामुळे शेतकऱ्यांच्या आशा देखील पल्लवीत झाल्या आहेत. मित्रांनो खरं पाहता उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच देशातील जनता उकाड्यामुळे अक्षरशा घामाघूम झाली आहे.
आपल्या राज्यातील विदर्भात उन्हाची झळ इतर विभागांच्या तुलनेत अधिक बघायला मिळाली. यामुळे मान्सुन लवकर येणार असल्याने शेतकरी समवेतच सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठी आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, मानसूनचा पहिला पाऊस दरवर्षी अंदमानमध्ये 25 मे च्या आसपास बरसत असतो मात्र यावर्षी जवळपास दहा दिवस अगोदर मान्सून अंदमान मध्ये येणार असून 25 मेच्या सुमारास तो केरळमध्ये दाखल होणार आहे तर आपल्या महाराष्ट्रात मान्सून एक जून रोजी हजेरी लावणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
निश्चितच यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून सर्वसामान्य जनतेस देखील उकाड्यापासून आराम मिळणार आहे.
देशात मान्सून आल्यानंतर हवामानात बदल झाला नाही तर मे च्या शेवटी किंवा 1 जून रोजी मान्सून हा महाराष्ट्रातील तळकोकण गाठणार असल्याचे विशेषज्ञ नमूद करत आहेत. निश्चितच येत्या काही दिवसात पावसाच्या रिमझिम सऱ्या उकाड्यापासून जनतेस आराम देणार आहेत. खरं पाहता मान्सून 7 जूनच्या आसपास आपल्या महाराष्ट्रात दाखल होतो मात्र या वर्षी तो लवकरच येणार असून एक जूनला मान्सूनचा पहिला पाऊस आपल्या राज्यात बघायला मिळू शकतो.
Share your comments