Maratha Protection :
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांची प्रकृती खालावत चालली आहे. आज जरांगे यांच्या उपोषणाचा १० वा दिवस आहे. ते पाणी पीत नसल्याने शरीरातील पाणी कमी झाले आहे तसेच पाणी पीत नसल्यामुळे युरिन आऊटपूट कमी होत आहे. त्यामुळे त्यांच्या किडनीवर होऊ लागला आहे.
जरांगे यांची प्रकृती बिकट होत असल्याने डॉक्टरांची एक टीम आंदोलनस्थळी दाखल आहे. सकाळी डॉक्टरांनी तपासणी करुन अँटीबायोटिक सुरू केले आहे. सध्या एक सलाईन लावण्यात आले आहे. तसेच प्रकृती पाहून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज दहावा दिवस आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. तसंच त्यांच्या अंगात ताकद राहिली नसल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागले आहे. त्यामुळे उपोषण स्थळीच जरांगे पाटील यांना सलाईन लावण्यात आली आहे.
जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याची बातमी पसरल्याने जालना, औरंगाबादसह आजपासच्या जिल्ह्यातून मराठा कार्यकर्ते अंतरवाली सराटीकडे यायला निघाले आहेत. अनेकजण याबाबत चौकशी करत आहेत.
दरम्यान, जरांगे यांची तबेत खालावली असल्याने अंतरवाली सराटी येथे आंदोलकांची मोठी गर्दी होत आहे. जालना येथील झालेल्या लाठी हल्ल्यानंतर सरकार विरोधात मराठा समाजाची संतापाची भावना वाढली आहे. राज्यात देखील आंदोलने सुरू आहेत.
Share your comments