1. बातम्या

यंदा आंबा लागणार कडू, अवकाळी पावसामुळे हापूस महागण्याची शक्यता

गेल्या आठवड्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अगदी हातातोंडाला आलेला घास निसर्गाने त्यांच्या तोंडातून काढून घेतला आहे. कोकणची अर्थव्यवस्था ज्या हापूस आंब्यावर अवलंबून आहे या हापूस आंब्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Mango

Mango

गेल्या आठवड्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अगदी हातातोंडाला आलेला घास निसर्गाने त्यांच्या तोंडातून काढून घेतला आहे. कोकणची अर्थव्यवस्था ज्या हापूस आंब्यावर अवलंबून आहे या हापूस आंब्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे येथील शेतकरी उध्वस्त झाला आहे. याचा थेट परिणाम आता आंबा बाजारपेठेवर होणार आहे. यामुळे कोकणचा हापूस आता महागण्याची शक्यता आहे. नुकताच सिंधुदुर्गमधील देवगडच्या किनारपट्टी भागात जोरदार अवकाळी पाऊस पडला.

हा परिसर आंबा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. येथील आंबे जगप्रसिद्ध आहेत. मात्र निसर्गापुढे आता हा शेतकरी हतबल झाला आहे. तसेच आंब्यावर केलेल्या औषध फवारण्या वाया गेल्या आहेत. परिणामी खर्च वाढला आहे. आंब्याचा मोहोर काळा पडला आहे. यामुळे आता उत्पनात घट होण्याची शक्यता आहे. यामुळे आता हापूसचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे.

यामुळे आता येथील शेतकऱ्यांवर कर्ज काडून कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. आंबा पिकावर अनेक घटक अवलंबून असतात. त्यातून अनेक उत्पादने बनवणारे कारखाने चालतात. रोजगार निर्मिती होते. मात्र आंबा पीक संकटात आल्याने त्यावर अवलंबून असलेले घटक अडचणीत सापडण्याची शक्यता शेतकऱ्यांना सतावत आहे. यातच हा आंबा आवडीने खाणारा वर्ग देखील मोठ्या आहे. या आंब्याची अनेकजण वाट बघत असतात. जर याचे दर वाढलेच तर अनेकांना तो विकत घेणे परवडणार नाही.

कोकणातून हापूस आंब्याची पहिली पेटी कुठे दाखल झाली तर त्याला विकत घेण्यासाठी अनेकांची तुंबळ गर्दी होत असते. अनेकजण हा हापूस आंबा आपल्या आवाक्यात येण्याची वाट बघत असतात. आता मात्र याचे दर वाढण्याची शक्यता आहे. आता पुढील काही काळात याचे दर समजणार आहेत. आता राहिलेला मोहोर टिकवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. यासाठी मोठा खर्च शेतकरी करत आहेत.

English Summary: Mango will be bitter this year, Hapus is likely to become more expensive due to untimely rains Published on: 12 January 2022, 06:18 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters