सर्वांना आवडणारे फळ म्हणजेच कोकणचा राजा येथील हापूस आंबा प्रसिद्ध आहे. सध्या याचा हंगाम सुरु होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे याची चव चाखता येणार आहे. असे असताना आता मात्र हे आंबे खरेदी करणे सर्वसामान्य लोकांना परवडणारे नाही. याचे कारण म्हणजे सध्या हे आंबे खूपच महाग झाले आहेत. कोकणचा राजा समजल्या जाणाऱ्या आंब्याची सांगलीच्या दुय्यम बाजार समितीमध्ये आवक सुरू झाली आहे. कोकणच्या आंब्याची पहिली पेटी आज सांगलीत दाखल झाली आहे. विशेष म्हणजे १३ नगाच्या एका पेटीला दाेन हजार पाचशे रुपयांचा दर मिळाला आहे. यामुळे कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी देखील खुश आहेत.
कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना वादळाचा मोठा फटका बसला होता. यामध्ये मोठ्या प्रमाणावर आंब्याचा मोहोर गळाला होता. यामुळे शेतकरी अडचणीत आले होते. यामुळे आता राहिलेल्या फळांना चांगला भाव मिळत आहे. यामुळे शेतकरी समाधानी आहे. काही दिवसांपूर्वी उत्पादन खर्च देखील मिळेल की नाही अशी शक्यता निर्माण झाली होती. सांगलीत आता कोकणातून आंब्याची आवक सुरू झाली आहे. यामुळे आंब्याची आतुरतेने वाट बघणारे आता आंबा खरेदी करत आहेत. तसेच पहिला आंबा खरेदी करण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात.
दरवर्षी फेब्रुवारीच्या मध्याला आंबा सांगलीत दाखल होत असतो. याचपद्धतीने सांगलीत हापूस आंब्याचे आगमन झाले आहे. पहिल्याच दिवशी आंब्याला २५०१ रुपयांचा दर मिळाला आहे. बाजारभाव जास्त असताना देखील अनेकजण आंबा खरेदी करण्यासाठी उत्सुक होते. कोकणाचा हा राजा आता हळूहळू देशासह परदेशात देखील जाईल. मात्र याचे दर असेल स्थिर राहावेत अशी शेतकऱ्याची अपेक्षा आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतील. तसेच आगामी काळातील पिकासाठी त्यांना तयारी करता येईल.
दरम्यान, कोकणच्या आंब्याचे आगमन झाल्याने व्यापारी आणि खरेदीदारांनी बोलीसाठी गर्दी केली हाेती. सध्या मोठ्या प्रमाणावर आवक होत नसल्याने अनेकांची मागणी जास्त होती आणि उत्पादकता कमी होती. येणाऱ्या काळात गरजेप्रमाणे आंबा उपलब्ध होईल. तसेच राज्यातील इतर ठिकाणचा आंबा देखील बाजारात येईल. यामुळे तेव्हा हे भाव कमी होण्याची शक्यता आहे. शेतकरी मात्र याकडे लक्ष ठेवून आहे.
Share your comments