देशात आंब्याचा हंगाम सुरु झाला पण कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला. वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याने शेतकऱ्यांचा आंबा शेतात पडून खराब होत आहे, यावर शेतकऱ्यांनी मार्ग काढला असून आंबा उत्पादक शेतकरी ऑनलाईनेच थेट ग्राहकांपर्यंत पोहचत आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून सोडविण्यासाठी राज्यातील सरकारने शेतकऱ्यांना आंबा विक्रीसाठी ऑनलाईन व्यासपीठ मिळवून दिले.
कर्नाटक राज्य आंबा विकास आणि विपणन महामंडळ मर्यादित (Karnataka State Mango Development and Marketing Corporation Limited ) (KSMDMCL) ने एक पोर्टल सुरु केले आहे. याचा आंबा उत्पादकांना आंबा विक्रीसाठी होत आहे. (https://karsirimangoes.karnataka.gov.in/) दरम्यान महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळानेही (Maharashtra State Agriculture Marketing Board ) (MSAMB) ऑनलाईनचा उपक्रम राबवला असून शेतकरी थेट ग्राहकांना आपला माल विकत आहे.
महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि कृषी विभाग यांच्यासमवेत कोकण भूमी प्रतिष्ठानही शेतातील हापूस अल्फोन्सो आंबा ग्राहकांच्या दारापाशी आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. कोकण भूमी प्रतिष्ठानने कोकणातून हापूस आंबे मुंबई, ठाणे, वसई, पुणे आणि पिंपरी अशा काही शहरांमध्ये नेण्यास सुरुवात केली आहे. तेलगांणा सरकार, फलोत्पादन विभाग आणि तेलंगणा राज्य फलोत्पादन विकास महामंडळाच्या सहयोगाने एक टी - फ्रेश नावाचे पोर्टल सुरू केले. (https://tfresh.org/) याच्या माध्यमातून ते शहरातील नागरिकांना त्यांच्या दारापर्यंत भाजीपाला आणि फळे पुरवत आहेत. तर शेतकरी व्हाट्सएप्पचा उपयोग आंबा विक्रीसाठी करत आहेत. मध्यस्थी नसल्याने शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळत आहे. कोकणातील एक शेतककरी मुंबईतील सोसायटीमध्ये आंब्याची पेटी विकत आहे. एका पेटीत ४ डझन आंबे असतात, यातून १५०० रुपयांची कमाई होत असल्याचे या आंबा विक्रेत्याने सांगितले.
Share your comments