सध्या देशात एकामागून एक रोग येत आहेत. यामुळे सर्वांची चिंता वादळी आहे. कोरोना महामारीनंतर आता जनावरांना देखील लंपी या रोगाने ग्रासले आहे. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. यामुळे आता खबरदारी म्हणून यावर्षीच्या ऑक्टोबरमध्ये सुरु होणाऱ्या गाळप हंगामासाठी वापरल्या जाणाऱ्या बैलांना लसीकरण करणे बंधनकारक असणार आहे.
सध्या लम्पी स्कीन' रोगाचा प्रादुर्भाव काही भागांमध्ये दिसून आल्यामुळे सर्वच साखर कारखान्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच बैल घेऊन जाणाऱ्या मजुरांच्या याद्या सादर करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. यंदाचा गाळप हंगाम हा येत्या १५ ऑक्टोबर पासून सुरु होणार असल्याची माहिती आहे.
याबाबतची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली आहे. यामुळे आता कारखान्यांनी तयारी सुरु केली आहे. याबाबत साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, "राज्याचा ऊस गाळप हंगाम ऑक्टोबरमध्ये सुरू होईल. त्यासाठी नेहमीप्रमाणे हजारो बैल विविध कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात येतील.
भारतीय डेअरी उद्योग आज जागतिक झाला आहे, सेबॅस्टियन बिमिता यांनी केले देशाचे कौतुक
लम्पी च्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जनावराचे आरोग्यविषयक नियोजन महत्त्वाचे राहील. त्यामुळे कारखान्यांकडे बैल घेऊन येणाऱ्या मजुरांची यादी संबंधित जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडे पाठविण्याच्या सूचना आम्ही राज्यातील सर्व साखर कारखान्यांना दिल्या आहेत. यामुळे लम्पी रोग प्रतिबंधक लसीकरण काटेकोरपणे राबविण्यास मदत मिळेल.
शेतकऱ्यांपुढे नवे संकट, घाेणस अळीचा प्रभाव वाढला, चावा घेतल्याने अनेक शेतकरी रुग्णालयात
आपापल्या साखर कारखान्याकडे बाहेरच्या जिल्ह्यातून बैलगाडीकरीता बैल घेऊन येणाऱ्या ऊस तोडणी मजुरांच्या नावांची गावनिहाय यादी अद्ययावत करा. ही यादी तातडीने संबंधित मजूर ज्या जिल्ह्यातून येणार आहेत त्या जिल्ह्याच्या पशुसंवर्धन उपआयुक्त पाठवा, असेही आदेश देण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या;
राज्याचा यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा..
नाफेडचा कांदा बाजारात येणार? शेतकऱ्यांची चिंता वाढली, दुष्काळात तेरावा महिना येण्याची शक्यता
Solar Pump Yojana: मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, सौरपंपावर 60 टक्क्यांची सूट, असा करा अर्ज
Share your comments