1. बातम्या

Soybean Crop Management : सोयाबीनवरील पिवळ्या मोझँक रोगाचे व्यवस्थापन

सोयाबीन वर पिवळा मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा मोठ्या प्रमाणावर उद्रेक होतो. हा विषाणूजन्य रोग मुंगबिन येलो मोझॅक या विषाणू मुळे होतो.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
Yellow mosaic disease on soybean update

Yellow mosaic disease on soybean update

प्रा.दिपाली सातव        

सोयाबीन हे राज्यातील कोरडवाहू क्षेत्रातील महत्वाचे नगदी पीक असून विदर्भ आणि मराठवाड्यातील ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था प्रामुख्याने या पिकावर अवलंबून आहे. मागील काही वर्षात सोयाबीन पिकाच्या क्षेत्रात सातत्याने वाढ होत असून सुमारे ३८ लाख हेक्टर  क्षेत्रावर या पिकाची लागवड करण्यात येते. मागील वर्षी सोयाबीन पिकावर  अपारंपरिक विषाणूजन्य पिवळा मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव पिकवाढीच्या कालावधीमध्ये आढळून आला आहे. येत्या खरीप हंगामात देखील या रोगाचा प्रादुर्भाव बर्‍याच ठिकाणी प्रामुख्याने दिसून येत आहे.  

काय आहे पिवळा मोझँक :

सोयाबीन वर पिवळा मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा मोठ्या प्रमाणावर उद्रेक होतो. हा विषाणूजन्य रोग मुंगबिन येलो मोझॅक या विषाणू मुळे होतो. या रोगाचा प्रसार मावा आणि पांढरी माशी मुळे डाळ वर्गीय कडधान्ये पिके मुंग,उडीद, चवळी, मटकी, वाल ,सोयाबीन या पिकांवर होतो. ह्या रोगामुळे पिकाचे ७० ते ९० टक्के पर्यंत नुकसान होऊ शकते.

प्रादुर्भावची कारणे आणि प्रसार :

*हा रोग मुंगबीन यलो मोझॅक या विषाणुंमुळे उद्भवतो.
*सोयाबीनच्या उभ्या पिकातील विषाणूग्रस्त झाडांपासून पांढरी माशी या किडीद्वारे या रोगाचा प्रसार होतो.
*या रोगाचा विषाणू केवळ कडधान्य पिकांवर येत असल्याने बिगर मोसमी हंगामात मूग, उडीद, वाल, चवळी, घेवडा इत्यादी पर्यायी पिकांवर तो जिवंत राहून सोयाबीन पिकावर संक्रमित होतो.
*या रोगास बळी पडणाऱ्या वाण/जातीची लागवड केल्याने या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. जेएस ३३५ हा वाण या रोगास बळी पडतो.

प्रादुर्भावची लक्षणे :

सुरुवातीला रोगग्रस्त झाडावरील पानांच्या शिरांमधील भागावर फिकटनेस्तेज, पिवळे ठिपके/चट्टे दिसतात. कालांतराने ठिपक्यांच्या/ चट्यांच्या आकारमानात वाढ होऊन संपूर्ण पान पिवळे पडून त्यातील हरितद्रव्याचा ऱ्हास होतो. अशा पिवळ्या पानांवर तांबूस-करपट रंगाचे ठिपके दिसतात. रोगग्रस्त झाडांवरील पाने अरुंद आणि वेर्डीवाकर्डी होऊन त्यांचा आकार लहान होतो. रोगग्रस्त झाडांवरील शेंगाची संख्या कमी होऊन त्यात लहान आकाराचे दाने भरतात किंवा संपूर्ण शेंगा दानेविरहीत व पोचट उपजतात आणि पर्यायाने उत्पादनात लक्षणीय घात येते.

एकात्मिक व्यवस्थापन :

• पेरणीसाठी निरोगी बियाण्याचा वापर करावा. तसेच रोग प्रतिकारक वाण/ जात उदा. जेएस २0-२९, जेएस २0-६९. जेएस ९७-५२ इत्यार्दीची लागवड़ करावी.
• सोयाबीन पिकाबरोबर मका किंवा तूर ही आंतरपिके घ्यावीत.
• शेत तणमुक्त ठेवावे.
• शेतात या रोगाची लागण दिसताच रोगग्रस्त झाडे समूळ उपटून नष्ट करावीत.
• पिवळा मोझंक या रोगाचा प्रसार पांढरी माशीद्वारे होत असल्याने या किंडीच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने खालीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात.
1. श्रयामिश्राँक्झाम ३ग्रॅम टक्के एफ.एस. या किंटकनाशकाची १0 मि.ली. प्रति किलो बियाणे या प्रमाण बीजप्रक्रिया करावी.
2. पीक पेरणीनंतर ३५ दिवसांनी 0.५ ट्क्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
3. ट्रायझोफाँस ४५ ईसी १६ मि.ली. प्रति १0 लीटर पाण्यात मिसळून साध्या पंपाने फवारणी करावी.
4. पांढरी माशीचा पुन्हा उद्रेक टाळण्यासाठी सिंथेटीक पायरेश्रॉइड किंटकनाशकांची फवारणी करु नये.
5. १२ इंच x१० इंच आकाराचे हेक्टरी १० ते १५ पिवळे चिकट सापळे लावावेत.

लेखक - प्रा.दिपाली सातव, सहाय्यक प्राध्यापक, कृषि महाविद्यालय,आष्टी
E-mail - satavdipali123@gmail.com
संपर्क - 9823546451

English Summary: Management of yellow mosaic disease on soybean Crop Management Published on: 15 September 2023, 04:02 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters