नाशिक जिल्हा म्हटले म्हणजे कांद्याचे पंढरी म्हटले तरी वावगे ठरणार नाही. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, बागलान, येवला, चांदवड, देवळा, कळवण व नांदगाव इत्यादी तालुक्यांमध्ये कांद्याचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
यावर्षीचा विचार केला तर या वर्षी पाण्याची उपलब्धता खूप चांगली असल्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये खूप प्रमाणात कांद्याची लागवड झालेली आहे त्यामुळेकांद्याचे देखील बंपर उत्पादन मिळेल अशी आशा आहे.परंतु या पार्श्वभूमीवरकांद्याची निर्यात वाढली तर उत्पादन जरी भरमसाठ वाढले तरी कांद्याचे भाव बर्यापैकी टिकून राहतील यासाठी निर्यातीला चालना देणे गरजेचे आहे. यासाठी मालेगाव बाजार समितीचे सभापतीराजेंद्र जाधव व शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली.
कांदा निर्यातीला चालना देण्यासाठीआपल्या माध्यमातून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा यासाठी या शिष्टमंडळाने शरद पवार यांना साकडे घातले.
सभापती जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानेदिल्ली येथील निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेतली. कारण यावर्षी कांद्याचे विक्रमी लागवड झाल्याने उत्पादन हे विक्रमी प्रमाणात येण्याची अपेक्षा आहे. परंतुकांद्याच्या निर्यातीत वाढ झाली तरच कांद्याचे भाव टिकतील अन्यथा भाव प्रचंड प्रमाणात कोसळण्याची भीती असून कांदा उत्पादकांना फार मोठे नुकसान सोसावे लागेल. यासाठी या शिष्टमंडळाने केंद्र शासनाने कांद्याची निर्यात वाढवावीत्यासाठी शरद पवार यांना साकडे घातले.यावेळेसज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केंद्राकडे कांदा निर्यात वाढीसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन देखील दिले.एवढेच नाही तर त्यांनी मालेगाव तालुक्यातील यंत्रमाग व फळ शेतीबाबत देखील सखोल चौकशी करून माहिती जाणून घेतली.
नक्की वाचा:उकाडा सहन होत नाही! तर मग एसी घ्यायचा विचार करत आहात तर ॲमेझॉन वर मिळताहेत कमी किमतीत एसी
नाशिक जिल्ह्यातील एकंदरीत कांदा लागवडीचे परिस्थिती….
यावर्षी जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस झाल्यामुळे पाण्याची उपलब्धता खूपच चांगली आहे व दुसरे असे की या वर्षी कांद्याचे भाव बऱ्यापैकी स्थिर राहिल्याने शेतकऱ्यांनी इतर पिकांना फाटा देत कांदालागवडीत बऱ्यापैकी वाढ केली आहे.यावर्षी जानेवारीच्यादुसऱ्या आठवड्यापासून कांद्याची लागवड होत होती व आता हे पीक काही दिवसांनी काढणी वर येईल. यावर्षी पाणी हे चांगले आहे तसेच या जिल्ह्यातील प्रमुख जलसिंचन प्रकल्पजसे की, हरणबारी, चणकापूर, गिरणा, पुनद हे प्रकल्प भरली असल्याने शेतकऱ्यांना पाण्याचे आवर्तन देखील मिळणार असल्यानेकांदा पिकाला पाण्याची कमतरता भासणार नाही व त्यामुळे कांद्याचे बंपर उत्पादन येणार आहे.
परंतु उत्पादन वाढले व निर्यातीत जर वाढ झाली नाही तर भाव पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मालेगाव बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव व शिष्टमंडळाने शरद पवार यांची भेट घेऊन मिरची संदर्भात साकडे घातल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केलेजात आहे.
Share your comments