बारामतील तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना प्रशासनाने वार्षिक सभेत सोमेश्वर कारखान्याच्या हद्दीतील १० गावे जोडण्याचा ठराव केला होता. या सभेत यामुळे मोठा गोंधळ झाला होता. यामुळे विरोधकांनी साखर आयुक्तांकडे याबाबत धाव घेतली होती.
हा ठराव साखर आयुक्त कार्यालयाने फेटावून लावला होता. साखर आयुक्तांच्या आदेशाविरुद्ध सोमेश्वर कारखान्याच्या हद्दीतील ४५ शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेथेही साखर आयुक्तांचा निर्णय योग्य ठरवत तो निर्णय उच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे.
यामुळे पवार समर्थकांना मोठा धक्का मानला जात आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे माळेगाव काखान्याच्या सत्ताधाऱ्यांना धक्का बसला आहे. माळेगाव कारखान्यावर सध्या विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या समर्थकांची सत्ता आहे.
ब्रेकिंग!नियमित वीजबिल भरणाऱ्या शेतकऱ्यांबाबत देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
माजी उपमुख्यमंत्र्यांचा कुटील डाव संपविण्यात यश आले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सहकार जिवंत राहण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले, गावे जोडण्याच्या विषय पुन्हा कोर्ट कचेरीच्या माध्यमातून सत्ताधारी संचालकांनी पुढे रेटण्याचा प्रयत्न केला.
परंतु न्याय व्यवस्थेने या प्रकरणी योग्य धोरण विचारात घेवून कारखाना प्रशासन, माजी उपमुख्यमंत्र्यांच्या संगनताने ४५ शेतकऱ्यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. हा माळेगावच्या सभासदांचा मोठा विजय आहे.
Vst शक्ती MT 932DI ट्रॅक्टर लहान शेतकऱ्यांसाठी एक चमत्कार, शेतकऱ्यांना होतोय फायदा..
याबाबत कारखान्याचे विरोधक ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे, माजी अध्यक्ष रंजन तावरे यांनी भूमिका मांडली. या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. एफआरपीबाबत देखील त्यांनी कारखान्यावर टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांची परिस्थिती बघून कृषिमंत्र्यांचा थेट अधिकाऱ्यांना फोन, महावितरणने थांबवली वसुली
रोजगार मेळावा प्रारंभ, 75 हजार उमेदवारांना नियुक्ती पत्रे वितरीत, मोदींची घोषणा..
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा कहर, 162 ठार शेकडो जखमी..
Share your comments