1. बातम्या

मोठी बातमी! आता 17 व्या वर्षी बनवा मतदान ओळखपत्र, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय..

आपल्याला मतदान ओळखपत्र करायचे असेल तर वयाची 18 वर्ष पूर्ण करावी लागतात. आता मात्र 17 वर्षावरील युवक-युवतींना यादीत आगाऊ अर्ज भरण्याची मुभा देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे आता मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी आता वयाची १८ वर्ष पूर्ण होण्याची वाट पाहावी लागणार नाही.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Make voter ID card

Make voter ID card

आपल्याला मतदान ओळखपत्र करायचे असेल तर वयाची 18 वर्ष पूर्ण करावी लागतात. आता मात्र 17 वर्षावरील युवक-युवतींना यादीत आगाऊ अर्ज भरण्याची मुभा देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे आता मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी आता वयाची १८ वर्ष पूर्ण होण्याची वाट पाहावी लागणार नाही.

यामुळे तरुण मंतदारांची संख्या देखील वाढणार आहे. तरूण १७ वर्षापेक्षा अधिक असतील तर त्यांना मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी अर्ज भरावा लागेल. तसेच नव्या मतदारांना १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबरपासून मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी अर्ज भरता येऊ शकतो. प्रत्येक तिमाहीला मतदार यादी अपडेट केली जाईल.

यानंतर पात्र मतदारांना पुढच्या तिमाहीत वयाची १८ वर्ष पूर्ण झाल्यावर मतदान करता येईल. यामुळे आता 18 वर्ष पूर्ण होण्याची वाट बघावी लागणार नाही. यासाठी तुम्हाला मतदार यादीत नाव असलेला प्रत्येक मतदार त्याचा आधार क्रमांक अर्ज क्र. ६ ब मध्ये भरून देऊ शकतो.

हे ही वाचा 
Crop Management: शेतकरी मित्रांनो; आडसाली उसाचे करा 'असे' व्यवस्थापन, मिळेल भरघोस उत्पन्न

नमुना अर्ज क्र. ६, ७ व ८ मध्ये १ ऑगस्टपासून सुधारणा करण्यात येत आहेत. नमुना ६ ब नव्याने तयार केला आहे. सुधारित अर्जानुसारच मतदारांनी मतदार यादीतील बदल अथवा नोंदणीची प्रक्रिया करावी. यामुळे तरुणांना हे फायदेशीर आहे.

महत्वाच्या बातम्या;
Fertilizers: आता भेसळयुक्त खते एका मिनिटातच समजणार; कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा
Kisan Credit Card: ...आणि शेतकरी वडिलांच्या मृत्यूनंतर बँकेने मुलाला दिले 15 लाख रुपये; जाणून घ्या नेमकं प्रकरण
Solar Panel: शेतकरी मित्रांनो; सोलर पॅनल बसवून मिळवा 24 तास मोफत वीज, सरकार देतंय 'इतके' अनुदान

English Summary: Make voter ID card age of 17 Election Commission's big decision Published on: 28 July 2022, 04:49 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters