भारतातील कोणत्याही नागरिकाला स्वत:ची ओळख पटवण्यासाठी आधार नंबर एक महत्त्वाचा दस्तऐवज बनला आहे. केंद्र सरकारकडून भारतीय नागरिकाला 12 अंकी युनिक ओळख नंबर जारी केला जातो, ज्यामध्ये व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, फोटोसह त्याची बायोमेट्रीक माहितीही असते.
जर तुम्हाला आधार कार्डवरील तुमचा फोटो आवडत नसेल तर तुम्ही तो बदलून घेऊ शकताा. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाकडे आधार नंबर जारी करण्याची आणि व्यवस्थापित करण्याची सोपवण्यात आली आहे. युआयडीएआय फक्त नाव, मोबाईल नंबर, जन्मतारिख, ई-मेल पत्ता आणि फोटो बदलण्याची ऑफलाइन सुविधा देते. हे ऑनलाइन आणि पोस्टद्वारे करता येत नाही. म्हणजेच एखादी व्यक्ती नावनोंदणी केंद्रावर जाते, त्याचवेळी फोटो अपडेट केला जाऊ शकतो. फोटो मध्ये बदल करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या नाव नोंदणी केंद्रावर जावे लागेल किंवा तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन देखील हे काम करु शकता.
आधार कार्डवरील फोटो बदलण्याची प्रक्रिया
-
सर्वात आधी तुम्हाला युआयडीएआय वेबसाइट uidai.gov.in वर लॉग इन करावे लागले आणि आधार नोंदणी फॉर्म डाउनलोड करावा लागेल.
हा आधार नोंदणी फॉर्म भरा आणि जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर सबमिट करा.
-
यानंतर आधार नोंदणी केंद्रावरील कर्मचारी तुमची बायोमेट्रिक माहिती घेईल.
-
यानंतर आधार नोंदणी केंद्राचा कर्मचारी तुमचा फोटो घेईल.
-
आता आधार नोंदणी केंद्राचा कर्मचारी 25 रुपये आणि जीएसटी चार्ज घेऊन तुमच्याा आधार कार्डमधील फोटो अपडेट करेल.
-
आधार नोंदणी केंद्राचा कर्मचारी तुम्हाला युआरएन सोबत एक स्लिप देखील देईल.
-
तुमचा आधार कार्ड फोटो बदलला आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही या युआरएन चा वापर करु शकता.
-
आधार कार्ड फोटो अपडेट केल्यानंतर नवीन फोटोसह अपडेट केलेले आधारकार्ड युआयडीएआय वेबसाईटवरुन डाउनलोड केले शकते.
Share your comments