परभणी : शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीकडे वळत आहे. शेतीत नवनवीन बदल करत आहे. अनेक ठिकाणी आधुनिक शेतीचा प्रयोग केला जात आहे. शेती योवसायात बदल केल्यास उत्पादनात नक्कीच वाढ होते. हे मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीसाठी अनेक प्रयोग शेतकऱ्यांनी केले आहेत.
मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगाची सुरुवात केली आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये यंदा रेशीम शेतीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. संपूर्ण माहिती घेऊन या व्यवसायाला सुरुवात केली आहे. मराठवाड्यातील परभणी जिल्ह्या यामध्ये अव्व्ल स्थानी आहे. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तर याचा दुहेरी फायदा झालेला आहे.
परभणी जिल्ह्यात रेशीम उद्योगात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील पूर्णा येथेच (Silk Fund) रेशीम कोष खरेदी मार्केट आहे. यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होत आहे. गेल्या वर्षभरात येथील मार्केटमध्ये तब्बल 88 हजार 530 किलो रेशीम कोषाची खरेदी झाली आहे. या माध्यमातून 3 कोटी 26 लाखाची उलाढाल झाली आहे. एवढेच नाही तर मराठवाड्यातील जालना, परभणी आणि आता नव्याने बीडमध्येही रेशीम कोष खरेदी सुरु झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली असल्याचे रेशीम विकास अधिकारी गोविंद कदम यांनी सांगितले आहे.
रेशीम बाजारभाव
परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथील खरेदी केंद्रावर गेल्या वर्षभरात 1 हजार शेतकऱ्यांनी 88 हजार 530 किलो रेशीम कोषची विक्री केली आहे. यामाध्यमातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाली आहे. सध्या 400 ते 450 किलो रेशीम कोषची आवक होत आहे. तर किमान 700 तर कमाल दर हा 800 एवढा आहे. गतवर्षीच्या तुलनेत दरात मोठी वाढ झालेली आहे. शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये केलेल्या बदलाप्रमाणे आता मोबदला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
शेतकऱ्यांचा दुहेरी फायदा
मराठवाड्यात गेल्या काही वर्षांपासून रेशीम शेतीचे क्षेत्र वाढत आहे. मराठवाड्यातील परभणी, जालना आणि बीड जिल्ह्यात रेशीम कोष खरेदी केंद्र झाले आहेत. त्यामुळे परराज्यात करावी लागणारी वाहतूक आता टळली आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन आणि येथेच बाजारपेठ मिळाल्याने अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत आहेत. शेतकऱ्यांचे परीश्रम आणि सातत्य यामुळे हे शक्य झाले आहे. शिवाय महारेशीम उद्योग केंद्राच्या माध्यमातून सातत्याने मार्गदर्शन होत असल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे. उत्पादनात तर वाढ झालीच आहे शिवाय दरही चांगला मिळत आहे.
Share your comments