राज्यात सर्वत्र कापूस लागवड केली जाते बऱ्याच अंशी शेतकरी कापसाच्या उत्पादनावर अवलंबून असतात. खानदेशातील बहुतांश शेतकऱ्यांचे अर्थकारण हे कापूस पिकावरच अवलंबून असते. मात्र कापूस पिकावर गेल्या काही वर्षापासून बोंड आळीचा प्रादुर्भाव हा वाढताना दिसत आहे. बोंड आळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागते. बदलत्या हवामानामुळे व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या फरदडीच्या हव्यासापोटी बोंड अळीचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढतच आहे.
बोंड आळीमुळे पुढच्या हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकावर ही बोंड आळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. यावर पर्याय म्हणून जाणकार लोक कापसाची पऱ्हाटी जाळून टाकण्याचा सल्ला देत असतात. मात्र हे जरी बोंड आळी वर समाधान असले तरी यामुळे शेतकऱ्यांना विशेष असा काही फायदा मिळत नाही. पण काही शेतकरी व तज्ज्ञांनी बोंड आळीला लगाम घालण्यासाठी एक भन्नाट उपाय शोधून काढला आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकर्यांचा बोंड आळीचा तंटा कायमचा मिटणार आहे शिवाय हजारो रुपयांचे कंपोस्ट खत देखील शेतकऱ्यांना यामुळे प्राप्त होणार आहे, आणि त्यामुळे रासायनिक खतावरचा खर्च देखील कमी होणार आहे. बोंड अळीमुळे कापूस उत्पादनात सुमारे 70 टक्क्यांपर्यंत होण्याची शक्यता असते. त्यामुळे याच्या समाधानासाठी काहीतरी उपाययोजना झाली पाहिजे म्हणून अनेक कृषी अधिकाऱ्यांनी यावर संशोधन केले.
शेवटी असे निदर्शनात आले की पऱ्हाटी जाळून नष्ट करण्याशिवाय काहीच पर्याय उरत नाही. मात्र सेवानिवृत्त कृषी अधिकारी कुवरसिंग मोहने यांनी बोंड आळीच्या समस्येपासून निदान प्राप्त करण्यासाठी एक नावीन्यपूर्ण उपाययोजना शोधून काढली आहे. त्यांच्या मते, मराठी जाळून टाकण्यापेक्षा त्याचे कंपोस्ट खत तयार करावे यामुळे बोंड आळीचा खातमा होईल शिवाय रासायनिक खतांचा वापर कमी करता येईल.
चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया कपाशीच्या पऱ्हाट्या पासून कसे तयार करायचे कंपोस्ट खत
शेतकरी मित्रांनो कापसाची काढणी झाल्यानंतर कापसाच्या ओल्या पऱ्हाट्याचा चार ते पाच थर पर्यंत ढीग लावावा. बायोडायनामिक एस 9 कल्चर 100 लिटर पाण्यात दोन किलो या प्रमाणात घ्यावे.
कापसाच्या पऱ्हाट्याचा एक थर लावला ती त्यावर बायोडायनामिक कल्चर व शेनाचे पाणी शिंपडावे. सेम अशीच प्रक्रिया चार ते पाच थरापर्यंत करावी. चार ते पाच थर लावून झाल्यावर त्याच्यावर संपूर्ण शेणाने सारवून घ्यावे. 70 दिवसांमध्ये कंपोस्ट खत यापासून तयार होऊन जाते. कुवरसिंग यांच्यामध्ये एक एकर क्षेत्रातील कापसाच्या पऱ्हाट्यापासून सुमारे दोन मेट्रिक टन कंपोस्ट खत प्राप्त केले जाऊ शकते.
Share your comments