शेती व्यवसाय म्हणून करा- शास्त्रज्ञ डॉ. जगदीश वाडकर

27 June 2020 07:37 PM

 

रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा आणि कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आधुनिक उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून शेतीकडे व्यावसायिक दृष्टीने कसे पाहावे याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने मल्टी लोकेशन कॉन्फरन्सच्या माध्यमातून शास्त्रज्ञांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.  जून महिन्याच्या सुरुवातीला  पावसाला सुरुवात झाली. पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांना जोर धरला. परंतु मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातुर झाला होता. या अनुशांघाने रिलायन्स फाउंडेशन आणि कृषि  विज्ञान केंद्र ,बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने  शेतकर्‍यांना  योग्य मार्गदर्शन मिळण्याकरिता मल्टी लोकेशन ऑडिओ कॉन्फरन्स  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 

येत्या  काळामध्ये शेती करताना काळजी कशी घ्यावी, काय उपाययोजना कराव्यात तसेच विविध पिकांवरील कीड रोग व्यवस्थापन शेतीमधील विविध समस्या, खताचे व्यवस्थापन,  हवामानाचा अंदाज याविषयी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास कृषि विज्ञान केंद्र बुलढाणा चे डॉ. अनिल तारू, (विषय विशेषज्ञ ) आणि डॉ.  जगदीश वाडकर (विषय विशेषज्ञ)  यांनी मार्गदर्शन  केले.  शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीतील समस्या विचारुन निराकरण करून तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले.  रिलायन्स फाउंडेशनच्या विविध कार्यक्रमांपैकी डायल आऊट काँफेरेन्स हा एक कार्यक्रम आहे.

या  कार्यक्रमामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून शेतकरी सहभागी झाले होते. अनेक शेतकर्‍यांनी कार्यक्रमात सहभागी होऊन आपले प्रश्न विचारले व त्यावर तज्ञांनी सोप्या शब्दात त्यांचे निरसरन केले. कार्यक्रमाचे आयोजन रिलायन्स फाउंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक शुभम लाखकर यांनी केले. कार्यक्रच्या यशस्वीतेसाठी श्री गणेश वायाळ यांनी अथक परिश्रम घेतले.शेतकर्‍यांनी अधिक माहिती करिता रिलायन्स फाउंडेशनच्या टोल फ्री क्रमांक 1800 419 8800 यावर कॉल करावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्री शुभम लाखकर यांनी केले.

Scientist Dr. Jagdish Wadkar agriculture Reliance Foundation Information Services krishi vigyan kendra buldhana कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा शास्त्रज्ञ डॉ. जगदीश वाडकर रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा
English Summary: Make agriculture a business- Scientist Dr. Jagdish Wadkar

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.