हिंदु धर्मातील एक महत्वाचा सण म्हणजेच मकरसंक्रात. भारत हा कृषीप्रधान देश आहे.इथे अनेक सण हे शेती संबंधित आहेत.तसच मकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेती संबंधित सण आहे.त्यामुळे या शेतीच्या दृष्टिकोनातून या सणाला खूप महत्त्व आहे.मकर संक्राती हे दीर्घ सूर्यप्रकाशाने भरलेल्या दिवसांचे आगमन दर्शवते आणि जे पिकांसाठी देखील आवश्यक आहे.महाराष्ट्रच नवे तर संपुर्ण देशभरामधये हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो हा सण हिवाळा संपल्याची आणि कापणीच्या हंगामाची सुरूवात झाल्याचे दशर्वतो.तर यावर्षी मकर संक्रात १४ जानेवारी किंवा १५ जानेवारीला होईल याबाबतीत अनेक लोकांच्या मनात संभ्रम आहे.ज्योतिषी आणि पंचांगानुसार मकर संक्रांतीचा सण १५ जानेवारीला साजरा केला जाणार आहे.
यंदा १५ जानेवारीला का होणार मकर संक्रात ?
ज्योतिषी आणि पंचांगानुसार मकर संक्रांतीचा सण १५ जानेवारीला साजरा केला जाणार आहे.या दिवशी सूर्य देव धनु राशीतून बाहेर पडून पहाटे ०२:५४ वाजता मकर राशीत प्रवेश करेल.आणि तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातोयंदा हा सण १५ जानेवारीला साजरा होणार आहे.या प्रसंगी शुभ मुहूर्त खालीलप्रमाणे असेल.
मकरसंक्रातीचे शुभ मुहूर्त
१.सूर्याचा मकर राशीत प्रवेश १५ जानेवारी रोजी पहाटे -०२:५४ वाजता होणार आहे.
२.मकर संक्रांती पुण्यकाळ -सकाळी ०७:१५ ते संध्याकाळी ०६:२१ पर्यंत आहे.
३.मकर संक्रांती महा पुण्यकाळ -सकाळी ०७:१५ ते ०९:०६ पर्यंत आहे.
महाराष्ट्रात ३ दिवस हा सण साजरा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.मकरसंक्रातीच्या आदल्या दिवसाला १४ जानेवारीला भोगीचा सण म्हणल्या जाते.मकर संक्रातीचा १५ जानेवारी हा मुख्य दिवस म्हणजे संक्रांत.संक्रांतीचा दुसरा दिवस १६ जानेवारी किंक्रात म्हणून साजरा करतात.तर पाहूया कशा पद्धतीने हे दिवस साजरे केले जातात..
१४ जानेवारी- भोगीचा सण
मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला महाराष्ट्रात भोगीचा सण म्हणतात.हा सण आनंद आणि उपभोगाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी सकाळी घर आणि परिसर स्वच्छ केला जातो. या दिवशी मिश्र भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, मुंगाची खिचडी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी इत्यादी पदार्थ बनवले जातात.या पदार्थांमध्ये तिळाचा वापर केला जातो.तिळाला शुभ आणि पौष्टिक मानले जाते.भोगीच्या दिवशी घरात जुन्या आणि अनावश्यक वस्तूंची होळी केली जाते.
१५ जानेवारी-संक्रांत सण
मकर संक्रांतीचा मुख्य दिवस म्हणजे संक्रांत.या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो.सूर्याचा उत्तरायण होणे हे भारतीय संस्कृतीत शुभ मानले जाते.या दिवशी लोक एकमेकांना तिळगुळ वाटतात आणि “तिळगुळ घ्या आणि गोड बोला” असे म्हणतात.महाराष्ट्रात सर्वत्र या दिवशी संक्रांतीच्या दिवशी एकमेकांना तिळगुळ देतात .घरोघरी गुळाची पोळी खाण्याची प्रथा आहे.
१६ जानेवारी -किंक्रात
संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रात म्हणता.संक्रांतीदेवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुरा नावाच्या राक्षसाला ठार मारले.आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले.म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो.पंचागात हा दिवस करिदिन म्हणून दाखवलेला असतो.हा दिवस शुभकार्याला घेतला जात नाही.या दिवशीही अनेक स्त्रिया हळदीकुंकू समारंभ साजरा करतात.त्यात एकमेकांना वाण देतात.तिळगुळ देतात अशी परंपरा आहे.दक्षिण भारतात तर किंक्रांतीचा दिवस 'मट्टू पोंगल' म्हणून साजरा करतात. या दिवशी गाई-बैलांना स्नान घालतात. त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालतात.त्यांना माळा घालून सजवतात. संध्याकाळी त्यांची गावातून मिरवणूक काढतात.अशा पद्धतीने मकरसंक्रात साजरा केली जाते.
Share your comments