1. बातम्या

हवामान बदलामुळे कोरडवाहु शेतीवर मोठा परिणाम

हवामान बदलामुळे कोरडवाहु शेतीवर मोठा परिणाम होत असुन यामुळे अन्‍न सुरक्षेचे उदिष्‍टे साध्‍य करणे अवघड होणार आहे. विशेषत: मराठवाडयातील पीक पध्‍दतीत मोठा बदल झाला असुन अन्‍न व चारा दोन्‍हीचे उत्‍पादन देणारी खरिप व रबी ज्‍वारी लागवडी खालील क्षेत्रात घट झाली, यामुळे जनावरासाठीच्‍या चाऱ्यांचा प्रश्‍न निर्माण होत आहे. त्‍यामुळे पशुंची संख्‍या कमी होत आहे, शेतकऱ्यांना नियमित वर्षभर उत्‍पन्‍न देणारा दुग्ध व्‍यवसायावर परिणाम होत आहे तर जमिनीसाठी लागणारे शेणखताचे प्रमाण कमी होत आहे, असे प्रतिपादन संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर यांनी केले.

KJ Staff
KJ Staff


हवामान बदलामुळे कोरडवाहु शेतीवर मोठा परिणाम होत असुन यामुळे अन्‍न सुरक्षेचे उदिष्‍टे साध्‍य करणे अवघड होणार आहे. विशेषत: मराठवाडयातील पीक पध्‍दतीत मोठा बदल झाला असुन अन्‍न व चारा दोन्‍हीचे उत्‍पादन देणारी खरिप व रब्बी ज्‍वारी लागवडी खालील क्षेत्रात घट झाली, यामुळे जनावरासाठीच्‍या चाऱ्यांचा प्रश्‍न निर्माण होत आहे. त्‍यामुळे पशुंची संख्‍या कमी होत आहे, शेतकऱ्यांना नियमित वर्षभर उत्‍पन्‍न देणारा दुग्ध व्‍यवसायावर परिणाम होत आहे तर जमिनीसाठी लागणारे शेणखताचे प्रमाण कमी होत आहे, असे प्रतिपादन संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वयीत कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्‍प व कृषी व शेतकरी कल्‍याण मंत्रालयाच्‍या (भारत सरकार) कृषी विभागाच्‍या विस्‍तार संचालनालय यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक 23 ते 30 ऑक्‍टोबर दरम्‍यान हवामान बदल व कोरडवाहु शेती यावर आठ दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले असुन सदरिल प्रशिक्षण कार्यक्रमाच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होतेव्‍यासपीठावर पुणे येथील भारतीय वेधशाळेचे शास्‍त्रज्ञ डॉ. ओ. पी. श्रीजीथविस्‍तार शिक्षण संचालक डॉ. प्रदिप इंगोलेप्रशिक्षणाचे आयोजक मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ. बी. व्‍ही. आसेवारडॉ. ए. एस. जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.

विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. प्रदिप इंगोले आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले कीबदलत्‍या हवामानाचा अल्‍पभुधारक व अत्‍यल्‍प भुधारक शेतकऱ्यांच्या जीवनावर जास्‍त परिणाम होत आहेदिवसेंदिवस पाण्‍याची पातळी खालवत असुन पाण्‍याचा प्रत्‍येक थेंबाचा कार्यक्षमरित्‍या शेतीत वापर करण्‍यावर भर द्यावा लागेलकमीत कमी संरक्षित सिंचनाची सुविधा केल्‍यास पिकांच्‍या उत्‍पादनात मोठी वाढ होतेयासाठी जलसंधारणच्‍या विविध उपाय योजना करणे गरजेचे आहेतसेच भारतीय वेधशाळेचे शास्‍त्रज्ञ डॉ. ओ. पी. श्रीजीथ भाषणात म्‍हणाले कीसंपुर्ण देशात तालुका पातळीवर हवामान अंदाज व कृषी सल्ला देण्याचे प्रयत्‍न चालु असुन प्रायोगिक तत्‍वावर काही भागात हा प्रकल्‍प कार्यान्‍वीत करण्‍यात आला आहे.

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ. बी. व्‍ही. आसेवार यांनी केलेसुत्रसंचालन डॉ. आर. एन. खंदारे यांनी केले तर आभार डॉ. जी. आर. हनवते यांनी मानलेसदरिल प्रशिक्षणात महाराष्‍ट्रआंध्र प्रदेशतेलगंणा व कर्नाटक राज्‍यातील कृषी विभागासह इतर विभागातील कृषी अधिकारी व शास्‍त्रज्ञांनी सहभाग नोंदविला आहे. उद्घाटन कार्यक्रमास विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ व अधिकारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

English Summary: Major impact on dryland farming due to climate change Published on: 29 October 2018, 07:24 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters