हवामान बदलामुळे कोरडवाहु शेतीवर मोठा परिणाम होत असुन यामुळे अन्न सुरक्षेचे उदिष्टे साध्य करणे अवघड होणार आहे. विशेषत: मराठवाडयातील पीक पध्दतीत मोठा बदल झाला असुन अन्न व चारा दोन्हीचे उत्पादन देणारी खरिप व रबी ज्वारी लागवडी खालील क्षेत्रात घट झाली, यामुळे जनावरासाठीच्या चाऱ्यांचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे पशुंची संख्या कमी होत आहे, शेतकऱ्यांना नियमित वर्षभर उत्पन्न देणारा दुग्ध व्यवसायावर परिणाम होत आहे तर जमिनीसाठी लागणारे शेणखताचे प्रमाण कमी होत आहे, असे प्रतिपादन संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी केले.
हवामान बदलामुळे कोरडवाहु शेतीवर मोठा परिणाम होत असुन यामुळे अन्न सुरक्षेचे उदिष्टे साध्य करणे अवघड होणार आहे. विशेषत: मराठवाडयातील पीक पध्दतीत मोठा बदल झाला असुन अन्न व चारा दोन्हीचे उत्पादन देणारी खरिप व रब्बी ज्वारी लागवडी खालील क्षेत्रात घट झाली, यामुळे जनावरासाठीच्या चाऱ्यांचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे पशुंची संख्या कमी होत आहे, शेतकऱ्यांना नियमित वर्षभर उत्पन्न देणारा दुग्ध व्यवसायावर परिणाम होत आहे तर जमिनीसाठी लागणारे शेणखताचे प्रमाण कमी होत आहे, असे प्रतिपादन संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्प व कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या (भारत सरकार) कृषी विभागाच्या विस्तार संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 23 ते 30 ऑक्टोबर दरम्यान हवामान बदल व कोरडवाहु शेती यावर आठ दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असुन सदरिल प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर पुणे येथील भारतीय वेधशाळेचे शास्त्रज्ञ डॉ. ओ. पी. श्रीजीथ, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदिप इंगोले, प्रशिक्षणाचे आयोजक मुख्य शास्त्रज्ञ डॉ. बी. व्ही. आसेवार, डॉ. ए. एस. जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदिप इंगोले आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, बदलत्या हवामानाचा अल्पभुधारक व अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांच्या जीवनावर जास्त परिणाम होत आहे. दिवसेंदिवस पाण्याची पातळी खालवत असुन पाण्याचा प्रत्येक थेंबाचा कार्यक्षमरित्या शेतीत वापर करण्यावर भर द्यावा लागेल. कमीत कमी संरक्षित सिंचनाची सुविधा केल्यास पिकांच्या उत्पादनात मोठी वाढ होते, यासाठी जलसंधारणच्या विविध उपाय योजना करणे गरजेचे आहे. तसेच भारतीय वेधशाळेचे शास्त्रज्ञ डॉ. ओ. पी. श्रीजीथ भाषणात म्हणाले की, संपुर्ण देशात तालुका पातळीवर हवामान अंदाज व कृषी सल्ला देण्याचे प्रयत्न चालु असुन प्रायोगिक तत्वावर काही भागात हा प्रकल्प कार्यान्वीत करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बी. व्ही. आसेवार यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. आर. एन. खंदारे यांनी केले तर आभार डॉ. जी. आर. हनवते यांनी मानले. सदरिल प्रशिक्षणात महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलगंणा व कर्नाटक राज्यातील कृषी विभागासह इतर विभागातील कृषी अधिकारी व शास्त्रज्ञांनी सहभाग नोंदविला आहे. उद्घाटन कार्यक्रमास विद्यापीठातील शास्त्रज्ञ व अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
English Summary: Major impact on dryland farming due to climate changePublished on: 29 October 2018, 07:24 IST
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
Share your comments