शेतकऱ्यांना आतापर्यंत नेहमीच रात्रीची वीज देण्यात येत होती. यामुळे दिवसभर काबाडकष्ट करून शेतीला पाणी देण्यासाठी रात्रभर जाग राहावं लागत. यामुळे अनेकदा याबाबत मागणी केली गेली आहे.
असे असताना आता आता शिंदे सरकारने एक निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांची ही डोकेदुखी कमी होणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज मिळणं शक्य होणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
शेतकऱ्यांना दिवसभर वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2 सुरू करण्यात येणार आहे. राज्य सरकारने 2019 मध्ये या योजनेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात केली होती. या योजनेचा उद्देश 2023 पर्यंत एक लाख कृषी पंप बसवण्याचा होता. बैठकीत पुढचा टप्पा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उन्हाळी भुईमुग किडींचे एकात्मिक व्यवस्थापन, शेतकऱ्यांनो जाणून घ्या...
राज्यातील शेतकऱ्यांना जवळपास आठ हजार मेगावॅट विजेची आवश्यकता आहे. त्यासाठी बारा ते तेरा हजार मेगावॅटचे प्रकल्प उभारण्याची आवश्यकता आहे. तसेच उपकेंद्रांसाठी शेतकऱ्यांची जमीनी भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत.
शेतकऱ्यांनो तुमचे महत्त्वाचे हक्क तुम्हाला माहीत आहेत का? जाणून घ्या होईल फायदा
देशात साखरेचं उत्पादनात घटलं, दर वाढण्याची शक्यता..
फळांच्या राजाला वाचवा, बदलत्या हवामानात हापूस आंब्याचे ५० ते ८५ टक्क्यांपर्यंत उत्पादन घटले..
Share your comments