मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी नाशिकमधून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. नाशिक मध्ये मक्याला हमी भावापेक्षा अधिक दर मिळाला असून यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. सध्या नाशिकमध्ये मक्याला 23 रुपये प्रति किलो एवढा दर मिळत आहे. गेल्या तीन वर्षापासून मक्याला कधीचं एवढा दर मिळाला नव्हता.
केंद्र सरकारने मक्यासाठी मिनिमम सपोर्ट प्राईस अर्थात हमीभाव 1875 रुपये प्रति क्विंटल एवढा ठेवला आहे. कित्येकदा मका उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव देखील मिळत नाही मात्र यावर्षी हमीभावापेक्षा अधिक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे.
यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मक्याची लागवड कमी केली. मक्याऐवजी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनला पसंती दर्शवली, यामुळे मक्याच्या उत्पादनात मोठी घट झाली आणि म्हणून कधी नव्हे तो मक्याला विक्रमी दर मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मक्याला 2100 प्लस बाजार भाव प्राप्त होत आहे.
जिल्ह्यात एकीकडे कांद्याच्या भावात मोठी घट बघायला मिळत आहे तर दुसरीकडे मक्याला समाधान कारक बाजार भाव मिळत आहे. या एकत्रित परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे सांगितले जात आहे. कृषी तज्ञांच्या मते येत्या काही दिवसात मक्याच्या भावात अजून वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे मका उत्पादक शेतकर्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
का वाढले दर:- यावर्षी सोयाबीनच्या उत्पादनात घट झाली असल्याने सोयाबीनला विक्रमी दर मिळत आहे. त्यामुळे कुकुट पालन व्यवसायात सोयाबीन खाद्य म्हणून वापरणे खर्चिक झाले आहे याशिवाय कुक्कुटपालन व्यवसायाचे कोरोणामुळे पार कंबरडे मोडले आहे.
त्यामुळे कोंबड्यांच्या खाद्यासाठी सोयाबीन ऐवजी आता मक्याला पसंती दिली जात आहे. मात्र, मक्याची देखील लागवड कमी असल्याने या हंगामात मक्याचा ही शॉर्टेज उत्पन्न झाला आणि म्हणूनच मक्याला देखील विक्रमी दर मिळत आहे. याशिवाय बांगलादेश मध्ये देखील भारतीय मक्याची मोठी मागणी बघायला मिळत आहे त्यामुळे आगामी काही दिवसात मक्याचे भाव अजून वाढण्याची चिन्हे दिसत असल्याचे जाणकार लोकांनी स्पष्ट केले आहे.
संबंधित बातम्या:-
रशिया आणि युक्रेन युद्धामुळे महागाई 15 टक्क्यांनी वाढणार; स्वयंपाक घरातील बजेट कोलमडण्याची चिन्हे
….. जर या पद्धतीने बाष्पीभवन होत राहिले तर जायकवाडी धरण होईल रिकामं; मराठवाड्यासाठी चिंतेची बाब
Share your comments