यावर्षी कापसाला संपूर्ण हंगामात विक्रमी बाजार भाव मिळत आहे, त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी सुखावल्याचे चित्र बघायला मिळत आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमवेतच आता मका उत्पादक शेतकऱ्यांची देखील बल्ले बल्ले होताना दिसत आहे. मराठवाड्यात मक्याला विक्रमी दर प्राप्त होत असल्याचे वृत्त समोर आले आहे. मराठवाड्यातील जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या मक्याची मागणी वाढली आहे आणि त्यामुळे बाजार समितीत मग त्याला कधी नव्हे तो विक्रमी दर प्राप्त होताना दिसत आहे. बाजार समितीत गेल्या आठवडाभरापासून मक्याची हजेरी लक्षणीय कमी झाली आहे, आवक कमी झाली असल्यामुळे बाजारपेठेत सध्या मक्याला सोन्यासारखा भाव प्राप्त होत आहे. बाजार समितीत मक्याला सरासरी 1700 रुपये प्रति क्विंटल एवढा दर प्राप्त होत आहे, तर कमाल दर 1820 रुपये प्रति क्विंटल एवढा यावेळी बघायला मिळत आहे.
शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भुसार शेतमालाची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होत असते. मका समवेतच इथे इतर भुसार शेतमाल विक्रीसाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती, जिल्ह्यात समवेतच संपूर्ण मराठवाड्यात समाधानकारक पाऊस पडला असल्याने मका उत्पादक शेतकऱ्यांनी भविष्यात मक्याला चांगला बाजारभाव मिळतो की नाही या भीतीने मका काढतात क्षणी बाजारपेठेत विक्रीसाठी लगबग सुरु केली. जिल्ह्यातील अनेक मका उत्पादक शेतकऱ्यांनी हंगामाच्या सुरुवातीलाच 1400 रुपये प्रतिक्विंटल ते 1600 रुपये प्रति क्विंटल या दराने आपला मका विक्री करून टाकला. त्यांनतर मक्याची बाजार समितीत लक्षणीय आवक घटली आणि परिणामी मक्याला 1600 रुपये प्रति क्विंटलपर्यंत सर्वसाधारण दर प्राप्त होताना नजरेस पडत आहे.
बाजार समितीत मक्याला सोळाशे रुपये पर्यंतचा बाजार भाव साधारणतः दीड ते दोन महिना कायम राहिला, त्यामुळे या काळात मोठ्या प्रमाणात मक्याची शेतकऱ्यांनी विक्री केली. म्हणून आता जिल्ह्यात ठराविक शेतकऱ्यांकडेच मका शिल्लक आहे, आणि शिल्लक मका देखील मका उत्पादक शेतकरी टप्प्याटप्प्याने विक्री करणे पसंत करत आहेत, त्यामुळे बाजार समितीत मक्याचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. एकंदरीत तयार झालेल्या समीकरणामुळे मागच्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात दीडशे रुपयांपर्यंत मक्याच्या बाजारभावात वाढ नमूद करण्यात आले आहे.
सध्या बाजार समितीत मक्याला अठराशे विस रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर प्राप्त होताना दिसत आहे. तसेच सर्वसाधारण दर देखील 1700 रुपये प्रतिक्विंटल असल्याने मका उत्पादक शेतकरी आनंदी असल्याचे चित्र जिल्ह्यात नजरेस पडत आहे.
Share your comments