1. बातम्या

महिंद्राच्या फार्म इक्विपमेंट सेक्टरने सुरू केले कृषी-ई केंद्र

महिंद्रा अँन्ड महिंद्राच्या फार्म इक्विपमेंट सेक्टर (एफईएस) जे १४.४ अब्ज डॉलर्सच्या महिंद्रा ग्रुपचा भाग आहे. शुक्रवारी 'फार्मिंग अँन्ड सर्व्हिस' या नव्या व्यवसायात भागीदारी म्हणून महाराष्ट्रात कृष-ई केंद्र सुरू केले आहेत.

KJ Staff
KJ Staff


महिंद्रा अँन्ड महिंद्राच्या फार्म इक्विपमेंट सेक्टर (एफईएस)  जे १४.४ अब्ज डॉलर्सच्या महिंद्रा ग्रुपचा भाग आहे. शुक्रवारी 'फार्मिंग अँन्ड सर्व्हिस' या नव्या व्यवसायात भागीदारी  म्हणून महाराष्ट्रात कृष-ई केंद्र सुरू केले आहेत. कृषी-ई हे शेतीसाठी तंत्रज्ञानाद्वारे चालविलेल्या सेवा पुरविते. हे यंत्र परवडणारे आणि शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होईल. संपूर्ण पीक चक्राच्या अभ्यासानंतर डिजिटल सेवांद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढविले जाईल हे याचे मुख्य उद्दीष्ट आहे, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.कंपनीने प्रथम औरंगाबाद व बारामती येथे कृषी-ई केंद्रे सुरु केली आणि नंतर महाराष्ट्रातील इतर सहा ठिकाणी जालना, वर्धा, नांदेड, पुणे, दौंड आणि सोलापूर येथे लवकरच कृषी-ई केंद्रे होणार आहेत. त्यानंतर अन्य राज्यांतही ही केंद्रे टप्प्या टप्प्याने सुरू होतील, असेही त्यात म्हटले आहे. या केंद्रांमध्ये ओमनी वाहिनीचा दृष्टीकोन आहे, जिथे शेतकरी डिजिटल एप्सच्या द्वारे वैयक्तिकृत सेवा घेऊ शकतात आणि कॉल सेंटरद्वारे कृष- सहाय्यकांपर्यंत पोहोचू शकतात.

जरी शेतीत गुंतवणूक आणि तांत्रिक नव कल्पनांनी भर भारतात झाली असली तरी शेतीच्या उत्पन्नामध्ये अधिक सुधारणा होण्यास बरीच गरज आहे. शेती करण्याच्या पद्धतीत बदल करून आम्हाला आमची भूमिका योग्यप्रकारे सिद्ध करायची आहे. मुख्य लक्ष म्हणून शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करून आणणे. भारतीय शेतकऱ्यांना स्पर्धात्मक खर्चावर तंत्रज्ञान पुरविणे आणि उत्पादन वाढण्यास सक्षम बनविणे   असे एम अँड एम फार्म इक्विपमेंट सेक्टरचे (एफईएस) अध्यक्ष हेमंत सिक्का म्हणाले.

कृषी-ईच्या माध्यमातून कंपनीने यापूर्वीच १ लाखाहून अधिक शेतकऱ्यांवर लागवड खर्च, पीक आरोग्य आणि उत्पादकता यावर परिणाम दर्शविण्यासाठी उपाय तयार केले आहेत, असे एम अँड एम एफईएस स्ट्रॅटेजी आणि फोर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष रमेश रामचंद्रन यांनी सांगितले. कृषी-ई कडे सध्या अंदाजे १००० डेमो प्लॉट आहेत. जिथे आम्ही शेतीबरोबर शेतीविषयक माहिती आणि प्रगत यांत्रिकीकरण समाधानाच्या जोरावर परिणाम दर्शविण्यासाठी काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

English Summary: Mahindra's Farm Equipment Sector launches Krishi-e Kendra Published on: 03 October 2020, 04:30 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters