बळीराजा हा खरंच राजा आहे फक्त त्याला निसर्गाची आणि बाजारपेठेची साथ लाभायला पाहिजे. जर निसर्गाने आणि बाजारपेठेने शेतकऱ्यांना साथ दिली तर शेतकरी राजाच खऱ्या अर्थाने जगाचा राजा असेल. शेतकरी राजा केव्हा कुठली गोष्ट साध्य करू शकतो याचा अंदाज बांधणे थोडं कठीणच आहे. अनेकदा शेतकऱ्यांना त्याच्या राहणीमानवरून उच्चभ्रू समाजात तो ज्या प्रतिष्ठेचा धनी आहे ती प्रतिष्ठा त्याला दिली जात नाही. असंच एक उदाहरण कर्नाटक राज्यातून समोर आले आहे. शोरूम मध्ये नवीन गाडी खरेदी करण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याला त्याच्या राहणीमानावरून शोरूमच्या सेल्समनने अपमानित केले आणि तुझ्याकडन ही गाडी खरेदी केली जाणार नाही असे म्हणत त्याला हीनवले. या सर्व प्रकरणामुळे त्या शेतकऱ्याला अपमानित झाल्यासारखे वाटले, आणि संतापात हा शेतकरी अवघ्या एका तासात गाडीची संपूर्ण किंमत रोख कॅश घेउन शोरूम मध्ये गाडी खरेदीसाठी हजर झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, केम्पेगौडा नामक एक शेतकरी बोलेरो पिकअप खरेदी करण्यासाठी महिंद्राच्या शोरूम मध्ये गेला होता, या शेतकऱ्याची राहणीमान अगदी साधी असल्यामुळे शोरूम मधील सेल्समनने त्याला अगदी उद्धटपणे वागणूक दिली व त्याचा अपमान केला. तसेच त्याला शोरूम मधून बाहेर जाण्यास देखील सांगितले. सेल्समॅन शेतकऱ्याला म्हणाला की "या गाडीची किंमत दहा लाख रुपये आहे आणि कदाचित तुझ्या जवळ दहा रुपये देखील नसतील" शेतकरी सेल्समॅन च्या या वागणुकीमुळे खूप आहत झाला. शेतकऱ्याच्या मते, त्याला त्यांच्या राहणीमानामुळे सेल्समनने शोरूम मधून बाहेर जाण्यास सांगितले. सेल्समनच्या उद्धट वागणुकीमुळे शेतकऱ्याला अपमानित झाल्यासारखे वाटले, त्यामुळे शेतकरी आणि सेल्समन यांच्यात बराच वेळ वाद देखील यावेळी बघायला मिळाला.
या दरम्यान कॅम्पगौडा या शेतकऱ्याने मी एका तासाच्या आत संपूर्ण गाडीची रक्कम आणून देतो पण तुम्ही मला गाडीची सेम डे डिलिव्हरी देण्यास तुम्ही समर्थ आहात का? अशी विचारना देखील केली. त्यानंतर शेतकरी शोरूम मधून निघाला आणि एका तासाच्या आत गाडीची संपूर्ण रक्कम रोख स्वरूपात घेऊन परत शोरूम मध्ये हजर झाला. गाडीची संपूर्ण रोख रक्कम शेतकऱ्याच्या हातात पाहून तो सेल्समन आणि शोरूम मधील अधिकारी देखील अवाक झाले. शेतकऱ्याने रोख रक्कम देऊन देखील शोरूम वाले सेम डे डिलिव्हरी देण्यास असमर्थ ठरले, शोरूम मे चार दिवसात गाडी मिळेल असे सांगितलं. सेल्समनने त्याच्या वागणुकीबद्दल शेतकऱ्याकडे माफी मागितली. परंतु शेतकरी मला तुमच्या शोरूम मधून गाडी घ्यायची नाही असे म्हणत आपले दहा लाख रुपये कॅश परत घेऊन गेला.
या घटनेचा व्हिडीओ संपूर्ण सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल झाला आहे. आणि कर्नाटक मधील हा शेतकरी संपूर्ण देशात एक चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकरणावरून बळीराजा हा खरच राजा आहे आणि आगामी काही दिवसात बळीचेच राज्य येईल हे सिद्ध होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओतील शेतकऱ्याचे संपूर्ण देशभरातून कौतुक केले जात आहे. अनेकांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करत महिंद्रा समूहाचे आनंद महिंद्रा यांना टॅग देखील केले आहे.
Share your comments