1. बातम्या

MFOI Award 2023 : गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते शेतकऱ्यांचा सन्मान

देशातील शेतकऱ्यांना एक वेगळी ओळख देण्यासाठी अग्रगण्य कृषी मीडिया हाऊस कृषी जागरणने सुरू केलेला 'महिंद्रा मिलियनेअर फार्मर ऑफ इंडिया अवॉर्ड 2023' आज 6 डिसेंबर पासून सुरू झाला आहे. या भव्य उद्घाटन समारंभात, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दीप प्रज्वलन करून महिंद्रा मिलियनेअर फार्मर ऑफ इंडिया पुरस्कार 2023 चे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी कृषी जागरण आयोजित या कार्यक्रमाला आल्याबद्दल प्रचंड आनंद व्यक्त केला. अशा प्रकारे शेतकऱ्यांना एका व्यासपीठावर आणणे अत्यंत कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाला आलेल्या शेतकऱ्यांना त्यांनी रासायनिक शेती सोडून नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले.

भावना भालशंकर
भावना भालशंकर
Mahindra Millionaire Farmer of India Award 2023 inaugurated by Governor Acharya Devvrat

Mahindra Millionaire Farmer of India Award 2023 inaugurated by Governor Acharya Devvrat

देशातील शेतकऱ्यांना एक वेगळी ओळख देण्यासाठी अग्रगण्य कृषी मीडिया हाऊस कृषी जागरणने सुरू केलेला 'महिंद्रा मिलियनेअर फार्मर ऑफ इंडिया अवॉर्ड 2023' आज 6 डिसेंबर पासून सुरू झाला आहे. या भव्य उद्घाटन समारंभात, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दीप प्रज्वलन करून महिंद्रा मिलियनेअर फार्मर ऑफ इंडिया पुरस्कार 2023 चे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी कृषी जागरण आयोजित या कार्यक्रमाला आल्याबद्दल प्रचंड आनंद व्यक्त केला. अशा प्रकारे शेतकऱ्यांना एका व्यासपीठावर आणणे अत्यंत कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाला आलेल्या शेतकऱ्यांना त्यांनी रासायनिक शेती सोडून नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले.

यावेळी राज्यपाल म्हणाले की, रासायनिक खतांच्या वापरामुळे पृथ्वीवरील पोषक तत्वांचा सतत ऱ्हास होत आहे आणि त्यातून उत्पन्नाची क्षमताही कमी होत आहे. रासायनिक खतांच्या वापरामुळे शेती विषारी झाली आहे. पृथ्वीवरील विष लोकांच्या अन्नात येत आहे. त्यामुळे लोकांमध्ये आजार वाढले आहेत. अन्न इतके विषारी झाले आहे की लोकांना कर्करोगासारख्या गंभीर आजाराने ग्रासले आहे. शेतकऱ्यांना स्वतःचे आणि देशाचे भविष्य सुरक्षित करायचे असेल तर आजपासूनच रासायनिक शेती सोडून नैसर्गिक शेतीचा अवलंब करायला हवा.

या वेळी भारताचे माजी सरन्यायाधीश आणि केरळचे राज्यपाल पी. सदाशिवम, कृषी जागरण आणि कृषी जगाचे संस्थापक आणि मुख्य संपादक एम.सी. डॉमिनिक, कृषी जागरण आणि कृषी जगतचे संचालक, शायनी डॉमिनिक, डॉ. यू.एस. गौतम- डीडीजी विस्तार, ICAR, डॉ. नीलम पटेल- वरिष्ठ सल्लागार कृषी, NITI आयोग, महेश कुलकर्णी- हेड मार्केटिंग, महिंद्रा आणि इतर अनेक अतिथी उपस्थित होते.

महिंद्रा मिलियनेअर फार्मर ऑफ इंडिया अवॉर्ड काय आहे ?                                                                                                   देशातील जवळपास प्रत्येक क्षेत्रात काही मोठे व्यक्तिमत्व आहे. त्याची एक खास ओळख आहे. पण, शेतकऱ्याचा विचार केला तर काहींना एकच चेहरा दिसतो, तो म्हणजे शेतात बसलेल्या गरीब आणि असहाय्य शेतकऱ्याचा. पण खरी परिस्थिती तशी नाही. हा संभ्रम दूर करण्यासाठी कृषी जागरणने 'मिलियनेअर फार्मर ऑफ इंडिया' अवॉर्ड शो सुरू केला आहे, ज्याच्या मदतीने शेतकऱ्यांना एक-दोन जिल्हा किंवा राज्य पातळीवरच नव्हे, तर राष्ट्रीय स्तरावरही वेगळी ओळख मिळेल. कृषी जागरणचा हा उपक्रम केवळ राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही देशभरातील काही आघाडीच्या शेतकऱ्यांची निवड करून वेगळी ओळख देण्याचे काम करेल. त्याचबरोबर या अवॉर्ड शोमध्ये अशा शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे जे वार्षिक 10 लाख रुपयांहून अधिक कमाई करत आहेत आणि शेतीत नवनवीन प्रयोग करून आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण करत आहेत. या अवॉर्ड शोमध्ये कृषी कंपन्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शनही केले जाणार आहे. याशिवाय या अवॉर्ड शोमध्ये मंत्री आणि अधिकारी यांच्यासह अनेक बड्या संस्थाही आपला सहभाग नोंदवणार आहेत.

शेतकऱ्यांचा झाला सन्मान -
महिंद्रा मिलियनेअर फार्मर ऑफ इंडिया पुरस्कार 2023 कार्यक्रमांमध्ये राज्य गुजरातचे राज्यपाल यांच्या हस्ते शेतकऱ्यांना ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

 

"प्रत्येक शेतकरी करोडपती होण्याची आकांक्षा बाळगतो आणि ज्यांनी ही कामगिरी केली त्यांचा सन्मान केला पाहिजे. लोकांचा शेतकरी आणि शेतीबद्दलचा विचार बदलणे हा त्यांचा उद्देश आहे. ते स्वतः शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत. त्यांचे वडीलही शेतकरी होते आणि त्यांनी वयाच्या १४ व्या वर्षापर्यंत शेतीही केली होती.जेव्हा जेव्हा त्यांनी शेती सोडून इतर क्षेत्रांकडे पाहिले तेव्हा कोणी ना कोणी रोल मॉडेल म्हणून सादर केले. पण, कृषी क्षेत्रात ना कुठला रोल मॉडेल आहे ना तो मोठ्या प्रमाणावर मांडला जात आहे. हे लक्षात घेऊन हा उपक्रम सुरू करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. मी वर्षापूर्वी पाहिलेल्या स्वप्नाला ‘MFOI पुरस्कार’ असे नाव देण्यात आले आहे. कृषी जागरण भविष्यात शेतकऱ्यांसाठी इतरही अनेक पुरस्कार शो आयोजित करेल."

एम.सी.डोमॅनिक, कृषी जागरण संस्थापक आणि मुख्य संपादक
“गेल्या काही दशकांमध्ये कृषी क्षेत्रातील महिलांची भूमिका झपाट्याने वाढली आहे. महिला शेतकऱ्यांनी या क्षेत्रात प्रत्येक पावलावर आपले योगदान दिले आहे, तरीही महिला या क्षेत्रात आपल्या अस्तित्वासाठी झगडत आहेत. मला आशा आहे की, 'द मिलियनेअर फार्मर ऑफ इंडिया अवॉर्ड-2023' मध्ये त्या महिला शेतकऱ्यांना पुरस्कृत केल्याने ज्यांनी कृषी क्षेत्रात स्वावलंबी बनून चांगली कामगिरी केली आहे, महिला शेतकऱ्यांबद्दलची मानसिकता बदलेल. तसेच हा पुरस्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी तुम्हा सर्व शेतकऱ्यांना आमंत्रित करण्यात येत आहे.”

शायनी डॉमिनिक, व्यवस्थापकीय संचालक – कृषी जागरण
English Summary: Mahindra Millionaire Farmer of India Award 2023 inaugurated by Governor Acharya Devvrat Published on: 06 December 2023, 01:56 IST

Like this article?

Hey! I am भावना भालशंकर. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters