1. बातम्या

क्रिकेटचा बादशहा महेंद्रसिंग धोनी बनला ग्लोबल शेतकरी

२०१९ च्या वर्ल्डकपाच्या अपयशानंतर क्रिकेटच्या दोन्ही प्ररकारच्या क्रिकेटमधून सुपर कुल कर्णधार महेंद्रसिंग धोनी निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेर धोनीने १५ ऑगस्ट २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
महेंद्रसिंग धोनीच्या शेतातील कॉलिफ्लॉवर

महेंद्रसिंग धोनीच्या शेतातील कॉलिफ्लॉवर

२०१९ च्या वर्ल्डकपाच्या अपयशानंतर क्रिकेटच्या दोन्ही प्ररकारच्या क्रिकेटमधून सुपर कुल कर्णधार महेंद्रसिंग धोनी निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेर धोनीने १५ ऑगस्ट २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला.

२०१९ च्या वर्ल्डकपाच्या अपयशानंतर क्रिकेटच्या दोन्ही प्ररकारच्या क्रिकेटमधून सुपर कुल कर्णधार महेंद्रसिंग धोनी निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेर धोनीने १५ ऑगस्ट २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. त्यामुळे सगळ्यांना प्रश्न होता की, क्रिकेटनंतर धोनी आता काय करेल? असा प्रश्न सर्वांना होता. क्रिकेट सोडल्यानंतर धोनीने मातीशी आपली नाळ जुंपली आणि शेती करू लागला. बऱ्याच काही दिवसांपासून धोनी सेंद्रिय शेती करत आहे. धोनी त्याच्या रांचीतील फार्म हाऊसमधील शेतात पिकलेल्या फळ भाज्यांना प्रचंड मागणी असून तो त्याचा शेतातील पिकलेला माल थेट दुबईला पाठवीत आहे.

      रांचीच्या भाजी बाजारांमध्ये धोनीच्या शेतीत पिकलेल्या फळ भाज्यांना प्रचंड मागणी असते. धोनीने सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या मटार आणि टोमॅटोनंतर दोन्हीच्या शेतातील ऑरगॅनिक कॉलिफ्लॉवरला मोठी मागणी आहे. मागील तीन वर्षापूर्वी ध्रुवा येथील सेंभो फार्म हाऊसमध्ये शेती आणि डेअरी व्यवसाय करण्यास सुरुवात केली होती.

आता त्या फार्म हाऊसवर मोठ्या प्रमाणात दुधाचे आणि फळभाज्यांचे उत्पादन होत आहे. ईजा फार्म नावाचा ब्रांड धोनीने बनवला असून याच ब्रँडने त्याच्या उत्पादनांची विक्री होत आहे.

आता ऑरगॅनिक कॉली फ्लॉवरला रांचीच्या बाजारात प्रचंड मागणी आहे. या कोली फ्लॉवरचे उत्पादन शेणखत आणि वर्मीकंपोस्ट वापरून घेण्यात आला आहे.

 माहिती स्त्रोत- डेलीहंट

English Summary: Mahendra Singh Dhoni became a global farmer Published on: 05 January 2021, 02:24 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters