घरगुती आणि कृषी पंप ग्राहकांकडे असलेली वीज थकबाकी महावितरण पुढील फार मोठी गंभीर समस्या आहे. ग्राहकांनी नियमित वीजबिल भरावे किंवा थकबाकी वसूल व्हावी यासाठी महावितरणकडून प्रोत्साहनपर विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात.
जेणेकरून ग्राहकांमध्ये नियमित वीजबिल भरण्याची सवय लागावीआणि थकबाकीदार शेतकऱ्यांकडून थकबाकी वसूल व्हावी हा त्या मागचा महावितरणचा हेतू आहे. याच पार्श्वभूमीवर महावितरणने 'विज बिल भरा, बक्षीस मिळवा' ही अभिनव योजना एक जूनपासून लागू केली.
नक्की वाचा:हम भी किसी से कम नहीं; नंदूरबारच्या वन मॅन आर्मी महिला शेतकऱ्याची लाखोंची कमाई
प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला एक हजार रुपयांपासून ते ई स्कूटर, मोबाईल, फ्रिज आधी बक्षिसे जिंकण्याची संधी ग्राहकांना मिळेल. योजना 1 जून ते 30 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. महावितरणच्या थकबाकीचा प्रमाणाचा विचार केला तर ती प्रचंड प्रमाणात आहे.
त्यामुळे महावितरण आर्थिक संकटात असून ग्राहकांची देखील थकबाकी वाढत चालली असल्यामुळे ग्राहकांचा नाहक वीजपुरवठा खंडित करण्याची नामुष्की ओढवली आहे. या परिस्थितीचा फटका नुसता कंपनीला बसतो असे नाही तर ग्राहकांना देखील मोठ्या प्रमाणात त्याचा फटका बसतो.
या परिस्थितीमध्ये सुधारणा व्हावी पुढे भविष्यात ग्राहकांवर जास्त थकबाकीचा भार पडू नये, यासाठी ग्राहकांनी नियमित वीज बिलाचा भरणा करावा व हा भरणा करण्यास त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून महावितरणने नियमित वीज भरणाऱ्या ग्राहकांसाठी ही योजना सुरु केली आहे.
नक्की वाचा:भारतीय गोवऱ्या पोहोचल्या जर्मनीत, लाखोंमध्ये मिळतेय ऑर्डर, एका गोवरीची किंमत तब्बल...
अशी जिंकता येतील बक्षिसे
बिल भरण्याची अंतिम मुदत असते त्या मुदतीच्या आत सर्व बिले भरावे लागतील. यामध्ये महावितरणचे कर्मचारी वगळले असून मराठवाड्यातील सर्व घरगुती ग्राहकांसाठी योजना असून महिन्याच्या दहा तारखेला सोडत होणार आहे.
यामध्ये मराठवाड्यातील 101 उपविभाग आतून एक हजार रुपयांपर्यंतची प्रत्येकी दोन बक्षिसे वस्तू स्वरुपात दिली जाणार आहेत. त्यातील एक बक्षीस पटकन बिल भरणाऱ्या ग्राहकांना तर दुसरे बक्षीस जो अंतिम मुदतीच्या आत बिल भरेल त्या ग्राहकासाठी असेल.
तसेच 22 विभागातून प्रत्येकी एका मिक्सर ग्राइंडर किंवा त्या समकक्ष एखादी वस्तू, नऊ मंडळातून प्रत्येकी एक मोबाईल हँडसेट किंवा टॅबलेट,
तीन परिमंडळातील प्रत्येकी एक एलईडी टीव्ही चे बक्षीस दिले जाणार आहे. एवढेच नाही तर प्रादेशिक कार्यालय स्तरावर ऑनलाइन बिल भरणाऱ्या ग्राहकांमधून प्रत्येक महिन्याला फ्रीजचे एक विशेष बक्षीस तर प्रादेशिक कार्यालय स्तरावर इलेक्ट्रिक स्कूटर या दर महिन्याला बंपर बक्षीसाचा समावेश आहे.
नक्की वाचा:पुणतांबामध्ये इतिहासाची पुनरावृत्ती होणार; आता शेतकरी घडवणार इतिहास
Share your comments