महावितरण विभागाकडून कृषी पंपाचे थकीत वीजबिल वसुली करण्यासाठी जोर लावला आहे. काही वेळा अचानकपणे विद्युत पुरवठा सुद्धा खंडित करावा लागत आहे. ज्या प्रमाणे वसुली करण्यासाठी जो जोर दाखवला जात आहे त्या प्रमाणे विद्युत पुरवठा मध्ये जोर दाखवला तर शेतकऱ्यांच्या शेतीचे तरी प्रश्न सुटतील. सध्याच्या स्थितीला शेतीला चार ही बाजूने संकट आले आहे. जसे की निसर्गाचा अनियमितपणा त्यामुळे रब्बी हंगामातील फळबागांचे नुकसान जे की अशा अडचणीच्या परिस्थितीत सुद्धा शेतकरी रब्बी हंगामातील पिकांना पाणी देत आहेत. रात्रीच्या वेळी ७ तास कृषिपंपाना विद्युत पुरवठा केला जात आहे त्यामुळे जे अडचणीत असलेले शेतकरी आहेत त्यांनी कशी शेती करायची . अनेक भागात रात्रीच्या वेळी वीजपुरवठा करत असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे त्यामुळे हा वीजपुरवठा दिवसा व्हावा अशी शेतकऱ्यांची ईच्छा आहे.
शेतकऱ्यांना करावा लागतोय रात्रीचा दिवस :-
रब्बी हंगाम सुरू होताच महावितरण आपल्या वेळापत्रकात बदल करते जे की रात्री तसेच दिवसा वीजपुरवठा करून रब्बी हंगामातील पिके जोपासली जात आहेत. सध्या बुलढाणा जिल्ह्यात रात्रीच्या वेळी वीजपुरवठा सुरू असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. शेतकरी दिवसभर रानात कष्ट करत असतो आणि रात्री च्या वेळी पाणी धरणे त्यामुळे आखी रात्री शेतकऱ्यांना काढावी लागत आहे. काही भागात तर रात्री १ वाजता वीजपुरवठा सोडत असल्याने तो ७ तास सुद्धा नियमित चालू राहत नाही आणि यामुळे रात्र जागून सुद्धा फायदा नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
सक्तीची वसुली मग सुविधा का नाहीत?
रब्बी हंगामातील पिके आता कुठेतरी बहरत आहेत तो पर्यंत महावितरण विभाग मधेच वीजपुरवठा खंडित करत आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत महावितरण विभाग शेतकऱ्यांकडून सक्ती करून थकबाकी वसूल करत आहेत पण त्याप्रमाणे शेतकऱ्यांना सुविधा देण्याचे काही थांबवत नाहीत. रात्रीच्या वेळी थंडीत शेतकऱ्यांना रानात जाऊन दारी धरावे लागत आहे जे की आपला जीव मुठीत धरून शेतकरी रात्रीच्या वेळी सुद्धा काम करत आहेत.
सर्व शेतकऱ्यांना समान पुरवठा :-
रब्बी हंगामामध्ये एकाच वेळी कृषिपंप चालू ठेवल्यास रोहित्रांमध्ये बिघाड जातो त्यामुळे आठवडा बदलानुसार यामध्ये काही बदल करून विद्युत पुरवठा सोडावा लागत आहे. सध्या शेतकऱ्यांची रात्रीच्या गैरसोय होत आहे हे माहीत आहे पण दुसरा पर्याय नसल्याने हाच हिताचा निर्णय आहे असे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी सांगितले आहे.
Share your comments